Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Supreme Court
देश-विदेश

Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले

उपराष्ट्रपती जगदिप धनकड यांनी नुकतेच सर्वाेच्च न्यायालयाला सुनावले हाेते. त्यापाठाेपाठ भाजपचे खासदार निशिकांत दुबे सर्वाेच्च न्यायालयावर बरसले आहेत. धार्मिक युध्दे भडकाविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालय जबाबदार असल्याचा आरापे करत कायदे करण्याचे काम तुमचे असेल तर संसद भवन बंद करा, असे त्यांनी म्हटले आहे.

West Bengal
देश-विदेश

West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत

हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? अशी कैफियत मांडत पश्चिम बंगालमधील दंगलग्रस्त भागातील महिलांनी आपली आपबिती राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांना सांगितली.राष्ट्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही नुकतीच माल्डा आणि इतर दंगलग्रस्त भागाला भेट देऊन महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या हाेत्या.

महाराष्ट्र

Supriya Sule : “भिसे मृत्यू प्रकरणात जबाबदार सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे”, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्व व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी

Narhari Zirwal
मुंबई

Narhari Zirwal : बनावट पनीरची विक्री केल्यास परवाना रद्द, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

बनावट पनीर किंवा चीज वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal
मुंबई

Chhagan Bhujbal : राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद, छगन भुजबळ यांचा विश्वास

राजकारणात काहीही होऊ शकते. मात्र एवढ्या घाईघाईत होईल, असं मला वाटत नाही. पण राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

Lakshman Hake
पुणे

Lakshman Hake : आज कुत्र्याला विरोध करताय, उद्या महादेवासमोरचा नंदीही काढा म्हणाल का? लक्ष्मण हाके यांचा सवाल

आज कुत्र्याला विरोध करताय, उद्या महादेवासमोरचा नंदीही काढा म्हणाल का?” असा रोखठोक सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रायगडावरील वाघ्या समाधीच्या समर्थनार्थ आवाज उठवला.

UNESCO
देश-विदेश

UNESCO : भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राला ‘युनेस्को’ची जागतिक मान्यता; भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा जागतिक सन्मान

भारतीय ज्ञानपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर डंका वाजला असून भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या दोन महान ग्रंथांचा समावेश ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये करण्यात आला आहे. या मान्यतेमुळे हे स्पष्ट झाले आहे की, हे ग्रंथ केवळ भारतापुरते मर्यादित नसून, संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

Sandeep Deshpande
मुंबई

Sandeep Deshpande : भाजपाला गद्दारी, आता शरद पवार व काँग्रेसला सोडण्याची तयारी, मग तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? संदीप देशपांडे यांचा थेट सवाल

भाजपाला गद्दारी, आता शरद पवार आणि काँग्रेसलाही सोडण्याची तयारी – मग अशा पक्षावर आम्ही विश्वास ठेवायचा तरी कसा?” असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला उद्देशून विचारला आहे.

Ashwini Vaishnav
देश-विदेश

Ashwini Vaishnav : वेव्हज शिखर परिषद भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देणारे जागतिक व्यासपीठ, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विश्वास

वेव्हज शिखर परिषद भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देणारे जागतिक व्यासपीठ बनेल असा विश्वास केंद्रीय मंत्री केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.

Dada Bhuse
महाराष्ट्र

Dada Bhuse : राज्यातील शिक्षकांना गणवेश अनिवार्य होणार; दादा भुसे यांची घोषणा

राज्यातील सर्व शालेय शिक्षकांसाठी लवकरच गणवेश अनिवार्य करण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेला दिलेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सूतोवाच केले.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे संकेत, भांडणं माझ्याकडून नव्हतीच, आता मिटवली… चला!” — मनसेसोबत युतीचं दार उघडं?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘टाळी’ची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या यूट्युब मुलाखतीत उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे करत ‘टाळी’चा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही थेट जाहीर कार्यक्रमात “भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती आता मिटवली… चला!” असे म्हणत संभाव्य युतीचा संकेत दिला.

harshwardhan sapkal
पुणे

Harshwardhan Sapkal : आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही. राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला

आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही, जोडले जात असतील तर स्वागतच आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.