Harshwardhan Sapkal : संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेशाच्या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा फडणवीसांवर थेट आरोप
तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचाराजीनामा दिला असून 22 एप्रिल रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी थोपटेंना “आत्मघाती निर्णय घेऊ नये” अशी विनंती वजा सूचना केली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.











