Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

Sushma Andhare मराठा आयोगात शेकडो कोटींचा गैरव्यवहार? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या आयोगात शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Fadnavis Government
मुंबई

Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने पैशांअभावी एका गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याचे घटनेनंतर राज्यातील फडणवीस सरकारने रुग्णालयांना चाप लावण्यास सुरुवात केली आहे. अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचार होण्यासाठी अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारने संबंधितांना दिल्या आहेत.

Woman Lawyer Brutally
महाराष्ट्र

Woman Lawyer Brutally : डीजेच्या आवाजाची तक्रार केल्यामुळे महिला वकिलाला अमानुष मारहाण; सरपंचासह 10 जणांवर आरोप

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ डीजेच्या आवाजाचा त्रास होतो, म्हणून तक्रार केल्याच्या रागातून गावातील 36 वर्षीय महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांना गावच्या सरपंचासह त्याच्या 10 कार्यकर्त्यांनी शेतामध्ये घेरून लाठ्या, काठ्या आणि पाईपच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

देश-विदेश

Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि जंगीपूर जिल्ह्यात उफाळलेल्या दंगलींमुळे हिंदू समाजावर झालेले अत्याचार दिवसेंदिवस उघड होत आहेत.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : दुसरा काही उद्योग नाही त्यांच्याकडून हिंदी विरोधाचं राजकारण, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

“हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली मातृभाषा आहे आणि इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा आहे. या तिन्ही भाषा आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. ज्यांच्याकडे दुसरा काही उद्योग नाही, तेच हिंदी विरोधाचं राजकारण करत आहेत,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका

मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल ना तर ती प्रगति आम्हाला नको, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : ‘साहेब असते तर चाबकानं फटकारलं असतं’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. दरेगाव येथील दौऱ्यात बोलताना त्यांनी सांगितलं की, “इतिहास कधीच गद्दारांना माफ करत नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली, काँग्रेससोबत जाणं टाळा असं स्पष्ट सांगितलं असताना जे त्यांच्या विरोधात गेले, त्यांना जनता विसरणार नाही.

MPSC
पुणे

MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेतील निकालातील अचूकता, पारदर्शकतेचा अभाव आणि पदसंख्या कमी असल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर 16 एप्रिल रोजी जोरदार आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती की, राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवसांनी घ्यावी आणि एकत्रित परीक्षांमध्ये (PSI, STI, ASO, SR) पदसंख्या वाढवण्यात यावी.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : रणजित कासलेंचा स्फोटक आरोप, “माझ्या खात्यात 10 लाख आले, धनंजय मुंडे फसवणुकीने निवडून आले”

निलंबित आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी पुण्यात दाखल होताच राजकीय आणि निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. कासले लवकरच पोलिसांसमोर शरण जाणार असल्याचे त्यांनी व्हिडीओद्वारे जाहीर केलं असून, दाखल होताच त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

MP Dr. Medha Kulkarni
महाराष्ट्र

MP Dr. Medha Kulkarni : अजान रोखण्याचा आरोप: खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचे खंडन, आरोप सिद्ध करण्याचे आव्हान

खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून अटकेची मागणीही करण्यात आली आहे. हा वाद हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी उफाळून आला, जेव्हा कुलकर्णी त्या परिसरात होत्या. आरोपानुसार, त्यावेळी जवळील ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यात सुरू असलेल्या नमाजाच्या अजानला रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असा दावा दर्गा ट्रस्टने तक्रारीत केला आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर दररोज ₹१००० दंड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांसाठी १०२७ सेवा अधिसूचित केल्या आहेत, त्यापैकी ५२७ सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र उर्वरित सेवा अद्यापही ऑनलाइन झाल्या नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित विविध सामाजिक क्षेत्रांच्या वॉररूम बैठकीत त्यांनी प्रशासकीय विभाग प्रमुखांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या की, ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दररोज ₹१००० चा दंड आकारण्यात यावा.

Deenanath Mangeshkar Hospital
पुणे

Deenanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा; ससून समितीच्या अहवालात दुर्लक्षाचे पुरावे नाहीत, मात्र तपास अद्याप सुरुच

तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासात महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. अमोल घैसास यांच्यावर थेट कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला या प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. हा सहा पानी अहवाल पुणे पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे.