Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Phule film
महाराष्ट्र

Phule film : इतिहास खराच दाखवला असेल तर बिनधास्त प्रदर्शित करा, फुले चित्रपटावर राज ठाकरे यांची भूमिका

‘फुले’ या चित्रपटावर सध्या निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या की, “चित्रपटाच्या टीमने राज ठाकरे यांची भेट घेतली असून, जर चित्रपटात दाखवलेला इतिहास सत्य व वस्तुनिष्ठ असेल, तर तो कोणत्याही दडपणाला न भिता बिनधास्त प्रदर्शित करावा.”

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : “मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही”, उद्धव ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात भाजपवर तीव्र हल्ला

मी भाजपला सोडलं, पण हिंदुत्व नाही. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही. पण मला बुरसटलेलं हिंदुत्व नकोय, आणि ते तुम्हालाही नको असायला हवं, असे म्हणत शिवसेना ठाकरे गट ‘निर्धार मेळाव्यात’ उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाचा राजकीय गैरवापर, वक्फ बोर्ड विधेयक, आणि EVM घोटाळा यावरून ठाकरे यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले,

Balasaheb's
महाराष्ट्र

Balasaheb : नाशिक मेळाव्यात एआय आवाजात बाळासाहेबांचे भाषण; बाळासाहेबांचा अपमान म्हणतनरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिकमध्ये 16 एप्रिल रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील AI तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेले भाषण. दाखविण्यात आले. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल करून तयार करण्यात आलेल्या या AI भाषणावर एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा वापर करावा लागतोय, हे दुर्दैवी आहे. कारण त्यांचे खरे विचार आजही आमच्यासोबत आहेत,” अशी टीका करत म्हस्केंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निशाणा साधला.

Beed
महाराष्ट्र

Beed : गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीडला दिलासा; टाटा टेक्नॉलॉजीकडून १९१ कोटींचं प्रशिक्षण केंद्र, ७ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, हत्या, अत्याचार आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याला आता एक सकारात्मक दिशा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी जाहीर केल्या आहेत.

Aurangzeb
देश-विदेश

Aurangzeb : औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्यावरून वाद शिगेला; याकूब तुसी यांची थेट संयुक्त राष्ट्राकडे धाव

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्द्याने आता आंतरराष्ट्रीय वळण घेतले असून, खुद्द संयुक्त राष्ट्र महासचिवांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मुघल सम्राट बहादूर शाह झफर यांचे वंशज असल्याचा दावा करणारे याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना पत्र पाठवून औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Kunal Kamra
मुंबई

Kunal Kamra : कुणाल कामराला अटक करता येणार नाही, उच्च न्यायालयाचा दिलासा

कॉमेडिअन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तीन तासांची सुनावणी झाल्यानंतर त्याच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याबाबतच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे. तसेच, जोवर यावर निर्णय दिला जात नाही, तोवर कुणाल कामरा यांना अटक करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Sujay Vikhe
महाराष्ट्र

Sujay Vikhe : जलजीवनच्या ठेकेदारांचे रोहित पवारांशी लागेबांधे, सुजय विखे यांचा आरोप

जलजीवनचे काम ठेकेदार नेमणूकीपर्यत आघाडी सरकारच्या काळात zak असून सर्व ठेकेदारांचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याशी लागेबंधे आहेत. आता सरकार बदलल्यामुळे आरोप होत आहेत, असा हल्लाबोल माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

आमची खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच आहे. फक्त आता ते अधिक गतीने धावताना दिसत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Mahagyandeep
मुंबई

Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू

डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

harshwardhan sapkal
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आमचं सरकार डबल इंजिनच नाही, तर डबल बूस्टर, तिघे मिळून करतोय राज्याचा विकास, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

आमचं सरकार केवळ डबल इंजिन सरकार नाही, तर डबल बूस्टर सरकार आहे. म्हणूनच विकासाचा वेगही डबल आहे. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार – तिघं मिळून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Aditya Thackeray
महाराष्ट्र

Aditya Thackeray : शंभर दिवसात सरकारने केले काय? आदित्य ठाकरे यांचा सवाल

महाराष्ट्रात 100 दिवसांमध्ये महिलांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? गेल्या 100 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली? तसेच या 100 दिवसांमध्ये तरुण-तरुणींसाठी काय केले?” असे सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.