Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Kalakendra Artists
मुंबई

Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती

राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध  तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे.

NCW
देश-विदेश

NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!

waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद, मालदा आणि जंगीपूर मध्ये प्रचंड हिंसाचार घडवून तिथल्या हिंदूंना कायमचे पलायन करायला लावण्याच्या निंदनीय घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी घेतली

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले आता कितीही उशिर झाला तरी बाेलणारच…

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करता आले नाही. अजित पवारांना भाषणाला वेळ का दिला नाही यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अजित पवार यांनी म्हटले आहे की येथून पुढे कितीही उशिर झाला तरी ठरविले आहे की दाेन तीन मिनिटे तरी बाेलायचेच.

Shiv Sena
महाराष्ट्र

Shiv Sena. : तुमचे शंभर बाप खाली उतरले, तरी शिवसेनेचे अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही…

नाशिक येथे हाेणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या प्रसिध्दीसाठी दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेण्याची वेळ आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गटाला भाजपला इशारा द्यायचा आहे. पण त्यासाठीही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील चित्रफित काढावी लागली आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : खड्डेमुक्त मुंबई: रस्त्याच्या कामात चुकीला माफी नाही, एकनाथ शिंदे यांचा इशारा

मुंबईतील खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. काँक्रिट रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदला जाणार नाही आणि खड्डे पडणार नाही. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही.

Unauthorized Dargah
महाराष्ट्र

Unauthorized Dargah : नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडण्याच्या कारवाईदरम्यान हिंसाचार; ३१ पोलीस जखमी

काठे गल्ली परिसरातील एका अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाची कारवाई बुधवारी पहाटेपासून सुरू करण्यात आली. मात्र कारवाईच्या अगोदर रात्रीच्या सुमारास परिसरात तणाव निर्माण झाला आणि जमावाकडून हिंसक आंदोलन करण्यात आले. पोलिसांवर दगडफेक झाली, काही वाहने फोडण्यात आली आणि या दगडफेकीत ३१ पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले असून ५७ संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र

Shiv Chhatrapati State Sports Award क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शकुंतला खटावकर यांना जीवनगाैरव

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात केली.

मुंबई

घरात बसून निवडणुका जिकंता येत नाही, एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टाेला

घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी काम करणारे लोक हवेत आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही

पुणे

Ajit Pawar रेशन दुकानदारांना अजित पवारांकडून कमीशनची भेट, अनेक वर्षांची मागणी केली पूर्ण

राज्यातील रेशन दुकानदारांची अनेक वर्षांपासूनची मागणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी पूर्ण केली आहे. रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या कमीशनमध्ये माेठी वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

मोदींकडे पत असेल तर विशेष पॅकेज आणून राज्याची आर्थिक घडी रुळावर आणा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

तुमची मोदींकडे पत असेल तर विशेष पॅकेज आणून राज्याची आर्थिक घडी रुळावर आणा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 

महाराष्ट्र

Raju Shetty एफआरपी निर्णयावर सरकारला चितपट करू, राजू शेट्टी यांचा इशारा

राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतक-यांना टप्या-टप्याने एफ. आर. पी. देण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करून एक रकमी एफ. आर. पी. देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज राज्य सरकारने एक रक्कमी एफ. आर. पी देण्याच्या कायद्याला मान्यता दिली.

Robert Vadra
देश-विदेश

Robert Vadra : गुरुग्राम जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वाड्रा यांना ईडी कार्यालयात

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज, मंगळवारी पायी चालत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहोचले. गुरुग्रामच्या शिकोपूर जमीन घोटाळ्यात त्यांची चौकशी केली जाईल. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत चौकशीसाठी ईडीने त्यांना दुसरे समन्स पाठवले होते. ८ एप्रिल रोजी पाठवलेल्या पहिल्या समन्समध्ये वाड्रा यापूर्वी हजर राहिले नव्हते.