Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Maharashtra Kesari
पुणे

Maharashtra Kesari : पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची इस्वाईतर्फे मागणी

पारंपरिक भारतीय मातीवरील कुस्ती (मिट्टी-कुस्ती) आणि तिच्या ऐतिहासिक किताबांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (ISWAI)  कटिबद्ध आहे. ‘हिंद केसरी’, ‘भारत केसरी’ आणि ‘रुस्तम-ए-हिंद’,महाराष्ट्र केसरी’या प्रतिष्ठित किताबांच्या परंपरेचे जतन करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलण्यात आली असल्याचे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी न्यायालयाकडे केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

PM Modi
देश-विदेश

PM Modi : टीएमसीच्या कोणत्याही अत्याचारी नेत्याला सोडले जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 मार्च) पश्चिम बंगालमध्ये 18,680 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमधील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसी पक्षावर जोरदार टीका केली. तसेच सभेला उपस्थित जनसमुदायाने दर्शविलेला उत्साह पाहून पश्चिम बंगालच्या लोकांच्या मनात काय चालले आहे हे स्पष्टपणे दिसून येते, असे म्हणत मोदींनी टोला लगावला.

Chhagan Bhujbal
मुंबई

Chhagan Bhujbal : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही; विशेष समित्यांबाबत भुजबळांकडून माहिती

आखाती देशात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढताना दिसत आहे. सरकारकडून गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Rapper Badshah
मुंबई

Rapper Badshah : बादशाहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून कपाळावर गोळी मारण्याची धमकी

बादशाह, तू हरियाणवी संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहेस. आधी 2024 मध्ये तुझ्या क्लबवर तुला ट्रेलर दाखवला होता, आता थेट तुझ्या कपाळावर गोळी मारू, अशी धमकी रॅपर आणि गायक बादशाहला लॉरेन्स बिश्नोई गँगने दिली आहे.

Dada Bhuse
मुंबई

Dada Bhuse : मराठी शिकविली नाही तर शाळेची मान्यता रद्द

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांना प्रथम समज देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर थेट मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली.

Atrocity Law
मुंबई

Atrocity Law : अॅट्रोसिटीच्या कायद्यात मोठा बदलः आता गुन्हा सिद्ध झाला तरच अटक

पूर्वी अॅट्रोसिटीचा गैरवापर केला जात असे. म्हणून आपण या कायद्यात बदल केले. आता अॅट्रोसिटी अंतर्गत एफआयआर दाखल झाल्यावरही समितीतर्फे चौकशी होते, गुन्हा सिद्ध झाला तरच अटक करण्यात येते अन्यथा एफआयआर रद्द होतो. कोणावरही विनाकारण अन्याय होऊ नये, हा यामागील उद्देश आहे, अशी माहिती विधानपरिषदेत बोलताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

Maharashtra
मुंबई

Maharashtra : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026′ विधानसभेत सादर; जबरदस्तीच्या धर्मांतरास 7 वर्षांची शिक्षा, 5 लाख दंड

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं धर्मांतरासंबंधी नियम आणि निर्बंध घालण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडलं. यावर चर्चा करून हे विधेयक मंजूर करण्यात येईल. या विधेयकात जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्याला आता 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षेची तरतूद आहे

Jay Pawar
मुंबई

Jay Pawar : माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद, जय पवार यांचे स्पष्टीकरण

“माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, पूर्ण माहितीनिशी पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार आहे,” असा खुलासा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केला.

Mungantiwar
मुंबई

Mungantiwar : हवेत का बोलता? जय पवार भाऊ, त्यांना फोन करायला वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवार यांचा रोहित पवारांना टोला

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? हवेत का बोलत आहात. मी व्यवस्था करतो फोन करायला, देवेंद्रजींना सांगून फ्री टेलिफोनची व्यवस्था करायला सांगतो, असा टोला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना लगावला.

Jitendra Dudi
पुणे

Jitendra Dudi : पुण्यात गॅस टंचाई नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाईबाबत विविध अफवा पसरत असताना प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Shambhuraj Desai
मुंबई

Shambhuraj Desai : पहिल्या मजल्यावरील झोपड्यांना नाही मिळणार कोणताही लाभ, शंभुराजे देसाईंची विधानसभेत माहिती

उपनगरामध्ये केवळ तळमजल्यावरील झोपड्यांनाच पुनर्विकासाचा लाभ देण्याची कायद्यात तरतूद असल्याने पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील तसेच पोटमाळ्यावरील झोपड्यांचा पुनर्विकासात समावेश करता येणार नसल्याचा निर्वाळा प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज गुरूवारी 12 मार्च रोज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला.

Pankaja Munde
मुंबई

Pankaja Munde : हवामान बदलावर नियंत्रणासाठी राज्याचा व्यापक आराखडा, पंकजा मुंडे यांची माहिती

हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा मर्यादित विषय नसून तो जगाच्या भवितव्याशी निगडित अत्यंत गंभीर आणि व्यापक व संवेदनशील प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा व्यापक आराखडा तयार असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.