विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal आखाती देशात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढताना दिसत आहे. सरकारकडून गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच विरोधक आंदोलन करून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहे. मात्र राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष समित्या स्थापन केल्याची माहिती दिली आहे.Chhagan Bhujbal
छगन भुजबळ यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने मी जनतेला करत आहे. तसेच राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे त्यांनी म्हटले आहे.
No Domestic LPG Shortage in State, Says Chhagan Bhujbal
महत्वाच्या बातम्या