विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट, जोरदार वादळी वारे तसेच काही भागांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Weather Department Warns
आयएमडीच्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या बदलाचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवू शकतो. नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नांदेड, परभणी, बीड, औरंगाबाद तसेच अहमदनगर, नाशिक, धुळे आणि जळगाव परिसरात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विशेषतः 18 ते 20 मार्च दरम्यान हवामान अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत काही ठिकाणी गारपीट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे उघड्या जागेत उभे राहणे टाळावे तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, ताडपत्री किंवा प्लास्टिकने झाकून ठेवावीत, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
तसेच फळबागांमध्ये असलेल्या आंबा, द्राक्ष, डाळिंब आणि केळी पिकांवरही या बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ शकतो. जोरदार वाऱ्यांमुळे झाडांना आधार देणे, शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवणे आणि कीड-रोग नियंत्रणासाठी आवश्यक फवारणी करणे, अशा उपाययोजना करण्याचेही कृषी तज्ज्ञांनी सुचवले आहे.
हवामान विभागाने नागरिकांना ताज्या हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले असून संभाव्य पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहितीही देण्यात आली आहे.
Thunderstorms and Hail Likely in Maharashtra for Four Days, Weather Department Warns
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन