विशेष प्रतिनिधी
मुंबई ; प्रत्येक छोटे हॉटेलवाले त्रस्त झाले आहेत. त्यांचे हॉटेल बंद करावे लागले आहेत. हॉस्टेलबंद पडत आहेत. लोकं 2 हजार रुपये देत गॅस सिलिंडर विकत घेत आहे. केंद्र सरकारला हे दिसत नाही का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र हे सरेंडर झाले आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. Congress
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सामान्य माणसांना गॅस आणि तेलासाठी ज्या समस्येला तोड द्यावे लागत आहे याचे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. त्यांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेच्या इशाऱ्यावर देश चालवणे योग्य आहे का? मोदी यांच्या इस्रायलसोबत आहोत या विधानामुळे आपल्याला इराणकडून मिळणारी साथ मिळत नाही. मंत्री सांगतात कसलीही कमतरता नाही, पण सिलिंडरसाठी दोन-दोन किमी रांगा लागताना दिसत आहे. गॅस आणि पेट्रोल संदर्भात राज्याची स्थिती काय आहे यावर सरकारने बोलले पाहिजे. लोकं त्रस्त झाले आहेत, त्यावर निर्णय घेतला गेला पाहिजे.
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, एपस्टीन फाइल्समुळे सरेंडर झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज संपूर्ण देशात गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवला आहे. हॉस्टेलमध्ये राहणारे मुले-मुले ते सुद्धा जेवनाची व्यवस्था होत नाही म्हणून सगळे सोडून गावाकडे निघाले आहेत अशी परिस्थिती झाली आहे. अनेक हॉटेल्स बंद झाल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर बंद व्हायला सुरूवात झाली आहे. त्यासाठी लोकं लाईनमध्ये लागायला लागली आहेत.
नाना पटोले म्हणाले की, राज्य सरकार अन् केंद्र सरकार या सर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेला आणि इस्रायलला सरेंडर झाले आहे त्यामुळे एपस्टीन फाइल्सचा परिणाम यांच्या पापाचा परिणाम सामान्य लोकांना भोगावा लागत आहे. मुंबई शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल्स बंद झाले आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार अजूनही झोपलेले आहे. म्हणून आम्ही सरेंडर दे सिलिंडर असे आंदोलन करत आहोत.
नाना पटोले म्हणाले की, सरकारने कुणाचे हातपाय पडायचे ते पडावे, यांच्या एपस्टीन फाइल्सच्या पापामुळे जनतेला त्रास होऊ देऊ नये. जनतेला वाऱ्यावर सोडता येणार नाही ही आमची भूमिका आहे. सरकारने सिलिंडर द्यावे. बाबा सरेंडर दे सिलिंडर अशी घोषणाबाजी वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली.
“Baba Surrender, Give Cylinders!” Congress Stages Unique Protest Outside Legislature
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन