विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jay Pawar “माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, पूर्ण माहितीनिशी पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार आहे,” असा खुलासा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केला.Jay Pawar
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधन प्रकरणातील ‘डीजीसीए’चा प्राथमिक अहवाल नाकारणारे जय पवार यांच्यावर ही सत्य परिस्थिती दडपण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? अशी चर्चा आहे. यावर स्पष्टीकरण देताना जय पवार म्हणाले, “माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. केवळ अर्धवट माहितीच्या आधारे समोर येण्यात अर्थ नाही. मला या प्रकरणाची अधिक सखोल आणि अतिरिक्त माहिती गोळा करायची आहे. सत्य माहिती हाती आल्याशिवाय बोलणे योग्य ठरणार नाही, म्हणूनच पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला.”Jay Pawar
मी पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेणार असून, माझ्या मनात असलेल्या सर्व शंका आणि वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर मांडणार आहे,” असे जय पवार यांनी यावेळी सांगितले. अजितदादांच्या मृत्यूबाबत आणि विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर त्यांनी आधीच असमाधान व्यक्त केल्याने, आगामी पत्रकार परिषदेत ते कोणता नवीन गौप्यस्फोट करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्याच विमानात फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचेही निधन झाले होते. जय पवार यांनी आज माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “पिंकी माळी यांच्या आईचे दुःख शब्दांच्या पलीकडचे आहे. हे दुःख सहजासहजी जाणारे नाही, मात्र आम्ही आता एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार आहोत,” असे भावूक उद्गार जय पवार यांनी यावेळी काढले.
‘No Pressure On Me’, Jay Pawar To Hold Press Conference Next Week
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन