Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

पुण्यात भाजपाची बंडखोरांवर मोठी कारवाई; ६ वर्षांसाठी निलंबन! शहराध्यक्ष घाटे यांची माहिती

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांना दिली.

Jaykumar Gore
महाराष्ट्र

Jaykumar Gore : राम सातपुते यांच्या खुनाचा कट, मंत्री जयकुमार गोरे यांचा खळबळजनक आरोप

भारतीय जनता पक्षाला चांगली मते मिळाल्याने माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांना मारहाण झाली. माजी आमदार राम सातपुते यांच्या तर खुनाचा कट आखला होता असा खळबळजनक आरोप सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

CM Devendra Fadnavis
मुंबई

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील गुंतवणूक देशात जास्तच नाही, तर रेकॉर्ड मोडणारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत असते. मात्र आता ही गुंतवणूक देशात जास्तच नाही, तर रेकॉर्ड मोडणारी ठरत आहे. आर्थिक व्यवस्थेला उत्सवाचे स्वरूप दिल्यामुळेच उद्योगस्नेही वातावरण राज्यात तयार झाले आहे. यामुळेच महाराष्ट्रात ‘रेकॉर्ड तोड’ गुंतवणूक होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Rohit Pawar
मुंबई

Rohit Pawar : काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना दिली शपथ, रोहित पवार यांचा अजित पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा

काकींची ( सुनेत्रा पवार ) इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांचे प्राधान्य वेगळे आहेत. आमच्या काकाचा अपघात झाला हे आमच्यासाठी प्राधान्याची गोष्ट आहे. काकी, पार्थ आणि जयलाही हे महत्त्वाची आहे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवार निशाणा साधला आहे.

Ranveer Singh
मुंबई

Ranveer Singh : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारा नंतर अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी; मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू

अभिनेता रणवीर सिंगसोबत धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी रणवीर सिंगला एका अज्ञात व्हॉट्सॲप नंबरवरून धमकीचा व्हॉईस नोट आला असून, त्यात करोडो रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

मुंबई

Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या भुसंपादनासाठी सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

महाराष्ट्र

चंद्रपूरमध्ये काॅंग्रेसला धक्यावर धक्के, महापाैरपद गेलेच पण उपमहापाैरपदाबाबत नशीबानेही दिली नाही साथ

काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीतून चंद्रपूर महानगरपालिकेत महापाैरपद गमवावे लागले. उपमहापाैरपदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाल्यावर नशीबानेही साथ दिली नाही. त्यामुळे काॅंग्रेसला लागाेपाठ दाेन धक्के बसले.

प्रशासन, महाराष्ट्र, मुंबई

उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पोटभाडेकरू असलेला उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला.
प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच मूळ पक्ष आहेत यावर मतदारांनी लागोपाठ तीनदा शिक्कामोर्तब केले असून त्या पक्षांवर बोलण्याचा अधिकार राऊतांना नाही असे श्री. बन यांनी नमूद केले.

मुंबई

हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा, राज ठाकरे यांचे सरसंघचालकांना आव्हान

देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिले आहे.

महाराष्ट्र

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला कार्यभार

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज विधिवतपणे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला.

Latest

पवार कुटुंबात सनई-चौघडे, रेवती सुळे यांचा ठरला विवाह

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह सारंग लखानी यांच्याशी निश्चित झाला आहे. सारंग हे नागपूर येथील विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.व्यवसायाबरोबरच सारंग लखानी हे क्रीडाक्षेत्रातही सक्रिय असून, ते एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने प्रथमच गाठला पन्नासच्या पुढचा आकडा

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी मतरूपी श्रद्धांजली वाहिली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच पन्नासच्या पुढचा आकडा गाठता आला आहे. एकूण ७३ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत जिल्हा परिषदेत निर्विवाद बहुमत मिळवले आहे.