Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

India–US
देश-विदेश

India–US Trade : भारत–अमेरिका व्यापार करार चौकटीवर डाव्या विचारसरणीच्या माध्यमांची कोल्हेकुई

भारत आणि अमेरिका यांच्यात जाहीर झालेल्या अंतरिम व्यापार चौकटीवर (Interim Trade Framework) डाव्या विचारसरणीच्या माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी अवघ्या काही तासांत कोल्हेकुई सुरु केली आहे. हा करार अंतिम नसताना, केवळ चर्चा आणि वाटाघाटींसाठीची चौकट असताना, त्याला “राष्ट्रीय शरणागती”, “आयएमएफ बेलआऊट” आणि “शेतकऱ्यांवरील घाला” अशा शब्दांत रंगवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

CM Devendra Fadnavis
मुंबई

CM Devendra Fadnavis : राज्यात 70 हजार पदांची मेगाभरती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात सुमारे 70 हजार पदांची मेगाभरती प्रक्रिया राबवण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि अत्याधुनिक डिजिटल पद्धतीने राबवण्यात येणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या 20 हजार जागांसह विविध विभागांतील इतर 50 हजार पदांचाही समावेश असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Satej Patil
महाराष्ट्र

Satej Patil : अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि मदत मागितली तर..सतेज पाटील यांचे हसन मुश्रीफ यांना आवाहन

मुश्रीफ साहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि त्यांनी मदत मागितली तर विचार करू, असे आवाहन कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले आहे.

PM Modi
मुंबई

PM Modi : जिल्हा परिषद निवडणुकीत विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

विशेष प्रतिनिधी मुंबई : PM Modi जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप व महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप पुन्हा एकदा नंबर

महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात जोरदार धक्का

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून आमदार विनय कोरे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसल्याचे चित्र आहे. भादोले, घुणकी आणि सातवे या तीनही जिल्हा परिषद मतदारसंघांत विनय कोरे समर्थित उमेदवारांचा पराभव झाला आहे.

Gadchiroli
महाराष्ट्र

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात उरले फक्त ७ नक्षली, ३१ मार्च या डेडलाईन पूर्वीच नक्षलवाद संपुष्टात येणार : मुख्यमंत्र्यांचा विश्वास

गडचिरोली जिल्ह्यात आता फक्त ७ नक्षली उरले आहेत. ३१ मार्च या डेडलाईन पूर्वीच नक्षलवाद संपुष्टात येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Vijayapura
महाराष्ट्र

Vijayapura : विजयपूरजवळ प्रशिक्षण विमान कोसळले; दोन जण जखमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाची चर्चा सुरू असतानाच कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात आणखी एका विमान अपघाताची घटना घडली आहे. कलबुर्गीहून बेळगावकडे जाणारे एक खासगी प्रशिक्षण विमान विजयपूर तालुक्यातील बबलेश्वरजवळील मंगळूर गावातील शेतात कोसळले. या अपघातात दोन जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Influencer
देश-विदेश

Influencer : ममतांचा राजकीय सूड, टीएमसीविरोधी रीलनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या अटकेवर वादळ

पश्चिम बंगालमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शमिक अधिकारी यांच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. टीएमसीविरोधात तीव्र टीका असणारा रील व्हायरल झाल्यानंतर काहीच दिवसांत शमिक अधिकारी यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने ही कारवाई राजकीय सूडातून झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Sudhir Bhau
महाराष्ट्र

Sudhir Bhau : चंद्रपुरात भाजपचा महापौर होणार ! सुधीरभाऊंचा काँग्रेसला दे धक्का

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनूनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला माती खावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार काँग्रेसला दे धक्का करून भाजपचा महापौर बसवण्याच्या तयारीत आहेत.

RSS Chief Mohan Bhagwat
मुंबई

RSS Chief Mohan Bhagwat : भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळे भाजपला अच्छे दिन, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

भाजपमुळे संघाला अच्छे दिन नसून त्याच्या उलट परिस्थिती आहे. खरं तर संघामुळे भाजपला अच्छे दिन आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

Ashish Shelar
मुंबई

Ashish Shelar : देवखेळ’ वेबसिरिजवर बंदी घाला; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

झी-5 ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘देवखेळ’ या वेबसिरिजमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून, या मालिकेवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Bhimashankar Temple
पुणे

Bhimashankar Temple : कुंभमेळा तयारीसाठी महाशिवरात्री काळातही भीमाशंकर मंदिर राहणार बंद

बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कुंभमेळा तयारीसाठी महाशिवरात्री काळातही भीमाशंकर मंदिर बंद राहणार आहे.