विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : Sudhir Bhau चंद्रपूर महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनूनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला माती खावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार काँग्रेसला दे धक्का करून भाजपचा महापौर बसवण्याच्या तयारीत आहेत.Sudhir Bhau
चंद्रपूर महापालिकेतील 66 जागांपैकी सर्वाधिक 27 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी 34 जागांची आवश्यकता असताना काँग्रेसमध्ये दोन गट पडले. खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चार बैठका घेतल्या होत्या. मात्र तरीही दोन्ही नेत्यांमधील तिढा न सुटल्याने काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना यात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांना महापौरपदाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी स्वत: माहिती दिली. मात्र आता भाजपा नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात भाजपचा महापौर होणार असल्याचा दावा केला आहे.Sudhir Bhau
सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातील महापौरपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, चंद्रपूर शहर मनपात भाजपचा महापौर होण्याच्या दृष्टीने सर्व चर्चा झाल्या असून उद्या दुपारपर्यंत निश्चित घोषणा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. संगीता खांडेकर या आमच्या अधिकृत उमेदवार आहेत. पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी देखील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. चर्चा पूर्ण झाली की लेखी स्वरूपात करार होणार आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा हा करार करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
चंद्रपुरात महापौर भाजपचाच होईल अशी कुठेच चर्चा दिसत नाही, असा प्रश्न विचारला असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चर्चा कॅमेरासमोर होत नाही. त्यामुळे ती बाहेर सांगणे शिष्टाचाराचा भंग होईल. परंतु आमच्या संगीता खांडेकर महापौर होतील हे नक्की. कारण मी स्वतः निधी आणि विकास कामांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोललो आहे. पूर्ण शक्तीनिशी चंद्रपूर महापालिकेच्या पाठीशी उभे राहू. कॉंग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या पक्षांशी आमचा संपर्क झाला आहे. मात्र ते सध्या थेट पद्धतीने आम्हाला पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असा दावाही सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांच्या गौप्यस्फोटानंतर चंद्रपुरात महापौर काँग्रेसचा होणार की भाजपचा? हे पाहावे लागेल.
BJP Set to Get Mayor in Chandrapur; Sudhir Bhau Deals Blow to Congress
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- विमान अपघातप्रकरणी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चार तास चौकशी
- Government identity : तृतीयपंथांना सरकारी “ओळख”;कोणत्या योजनांचा मिळणार लाभ?
- CM Devendra Fadnavis : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प