विमान अपघातप्रकरणी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चार तास चौकशी

विशेष प्रतिनिधी

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बारामती दौऱ्याचे नियोजन नेमके कोणी केले, प्रवासाचा आराखडा कसा तयार झाला आणि आदल्या दिवशी कोणत्या चर्चा झाल्या, याबाबत सीआयडी अधिकारी तपशील गोळा करत आहेत. खासगी सचिव अविनाश सोलवट यांची चार तास चौकशी झाली. Ajit Pawar

अजित पवार मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान कोस ळून झालेल्या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या तपासाचा भाग म्हणून सीआयडी अधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सविस्तर चौकशी केली. ही चौकशी चार तासांहून अधिक काळ चालली. 28 जानेवारी रोजीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन कसे झाले, प्रवासाची वेळ, विमान प्रवासाची तयारी, तसेच 27 जानेवारीच्या रात्री झालेल्या चर्चांबाबत अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले. दौऱ्याशी संबंधित प्रत्येक तपशील नोंदवून घेतला जात आहे.अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे, किंवा इतर कोणते कारण यामागे असू शकते का, याचा अंदाज घेतला जाणार आहे. चौकशी केवळ कागदोपत्री माहितीपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष घटकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. Ajit Pawar



दरम्यान, काही राजकीय नेत्यांनी या अपघाताबा बत संशय व्यक्त केल्याने, त्या शक्यतांचाही तपासात समावेश करण्यात आला आहे. सीआयडी अधिकारी सर्व बाजूंनी माहिती तपासत आहेत. त्यामुळे तपास तांत्रिक बाबींपुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूपात केला जात आहे. उपलब्ध माहिती, नोंदी, साक्षी आणि तांत्रिक तपशील यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन यापूर्वीच जाहीर झाले आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनाचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल आणि पायलटमधील संवाद यासारखी महत्त्वाची तांत्रिक माहिती गोळा केली जाणार आहे. या माहितीमुळे उड्डाणादरम्यान काय घडले, याचा अंदाज बांधता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्यांचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे. विमान जमिनीवर आदळल्यानंतर काय परिणाम झाला, आग कधी आणि कशी लागली, तसेच विमानाच्या सांगाड्याशी संबंधित तपशील तपासले जातील. या सर्व प्रक्रियेनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सीआयडीच्या या तपासाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. Ajit Pawar

CID Grills Ajit Pawar’s Aide in Plane Crash Case

महत्वाच्या बातम्या