विशेष प्रतिनिधी
नागपूर: काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या देशाचे विभाजन झाले आहे. आज देखील काँग्रेस यातून सुधारलेले नाही. वारंवार ते तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. यावर आमचे स्पष्ट शब्दात म्हणणे आहे की, कोणताही जात, धर्म न पाहता, सर्वांसाठी न्याय मिळायला हवा. मात्र तुष्टीकरण कोणासाठीही नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला. Devendra Fadnavis
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांना दिलेला आव्हानाला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुलचालन करण्याचं काम तिथल्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या देशांमध्ये जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाचे, लांगुलचालन करण्याचे राजकारण झाले, त्या-त्या वेळी या देशाला त्याचे नुकसान भोगावे लागले आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष मतदानाकरता लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, लोक त्यांना साथ देणार नाहीत. Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले… ते आजही तुष्टीकरण करत आहेत. आम्ही स्पष्टपणे म्हणतो की न्याय सर्वांसाठी आहे, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, पण तुष्टीकरण कोणासाठीही नाही.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी लढ्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. गडचिरोली पोलिसांच्या C-60 जवानांनी अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत राबवलेल्या मोहिमेमध्ये सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑपरेशनचे कौतुक करत C-60 जवानांचे आणि पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची एकच कंपनी शिल्लक होती आणि त्या कंपनीतील प्रमुख सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलात पार पाडण्यात आले. या भागात यापूर्वी फारशा मोहिमा झालेल्या नव्हत्या. तीन दिवस सलग पोलिसांनी या जंगलात तळ ठोकून रणनीती आखली. दोन बाजूंनी घेरा घालून नक्षलवाद्यांना अडवण्यात आले आणि त्यानंतर जोरदार चकमक झाली. Devendra Fadnavis, Congress
या चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. तरीही पोलिसांनी संयम, धैर्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या मोहिमेत सात नक्षलवादी ठार झाले असून त्यामध्ये नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकर याचाही समावेश आहे. प्रभाकर हा कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी होता तसेच गडचिरोली विभागीय कमिटी आणि वेस्ट सब-झोनल ब्युरोचा प्रभारी म्हणून तो कार्यरत होता. त्याच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
या कारवाईनंतर राज्यातील नक्षलवादी ताकद आता फारच मर्यादित राहिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या बाजूने आता फक्त बोटावर मोजण्याइतके, म्हणजे तीन ते चार मोठे नक्षलवादी उरले आहेत. वेगाने नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने राज्य पोलिस दलाचे प्रयत्न सुरू आहेत. C-60 जवानांच्या शौर्यामुळे आणि चिकाटीमुळे हे यश मिळाले असून यामुळे सामान्य नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. Devendra Fadnavis, Congress
या यशस्वी मोहिमेत दुर्दैवाने एक पोलिस जवान शहीद झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले की, बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केलेले असतानाही रणनीतीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू झाला. राज्य शासन शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
Congress Appeasement Politics Led to Nation’s Partition, Alleges CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक