कोल्हापूरमध्ये आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात जोरदार धक्का

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून आमदार विनय कोरे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसल्याचे चित्र आहे. भादोले, घुणकी आणि सातवे या तीनही जिल्हा परिषद मतदारसंघांत विनय कोरे समर्थित उमेदवारांचा पराभव झाला आहे.Vinay Kore

घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार यांनी विजय मिळवला आहे. घुणकी पंचायत समितीत जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते विजयी झाल्या आहेत. नवे पारगाव पंचायत समितीत काँग्रेसचे भारत विरधवल पाटील यांनी बाजी मारली आहे. Vinay Kore



सातवे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला. सातवे जिल्हा परिषदेत डॉ. जयंत पाटील विजयी झाले असून, सातवे पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिक पाटील विजयी झाले आहेत. माले पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या भारती पाटील यांनी विजय मिळवला आहे.
भादोले जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली होती. Vinay Kore

आतापर्यंतच्या निकालांनुसार काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर १० जागांसह आहे. भाजप आणि शिवसेना प्रत्येकी ७ जागांवर विजयी ठरल्या आहेत. जनसुराज्यने ४, ठाकरे गटाने २ तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १ जागा मिळवली आहे.

Vinay Kore Suffers Major Setback in His Kolhapur Stronghold

महत्वाच्या बातम्या