Vijayapura : विजयपूरजवळ प्रशिक्षण विमान कोसळले; दोन जण जखमी

विशेष प्रतिनिधी

बेळगाव : Vijayapura उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाची चर्चा सुरू असतानाच कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात आणखी एका विमान अपघाताची घटना घडली आहे. कलबुर्गीहून बेळगावकडे जाणारे एक खासगी प्रशिक्षण विमान विजयपूर तालुक्यातील बबलेश्वरजवळील मंगळूर गावातील शेतात कोसळले. या अपघातात दोन जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.Vijayapura

अपघातग्रस्त विमान हे रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे प्रशिक्षण विमान असल्याची माहिती आहे. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.Vijayapura



कलबुर्गीहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला किंवा इंधन संपल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे वैमानिकाने आपत्कालीन उतरणीचा प्रयत्न केला, मात्र विमान थेट शेतात कोसळले.

या अपघातात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले. विमान कोसळल्याची बातमी पसरताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या अपघाताची चौकशी सुरू असून नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणा करत आहेत.

Training Aircraft Crashes Near Vijayapura; Two Injured

महत्वाच्या बातम्या