विशेष प्रतिनिधी
मुंबई: Ashish Shelar झी-5 ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘देवखेळ’ या वेबसिरिजमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून, या मालिकेवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. Ashish Shelar
या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात शेलार यांनी म्हटले आहे की, ‘देवखेळ’ वेबसिरिजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ‘नमन खेळे’ या पौराणिक लोककलेचे विपरीत आणि अवमानकारक चित्रण करण्यात आले आहे. या लोककलेतील लोकदैवत मानल्या जाणाऱ्या ‘शंकासूर’ या पात्राचे सादरीकरण कोकणवासीयांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे, असा नागरिक आणि कलावंत संघटनांचा आक्षेप आहे. Ashish Shelar
नमन खेळे ही कोकणातील अत्यंत प्राचीन, पवित्र आणि सामाजिक-धार्मिक महत्त्व असलेली लोककला असून तिचा थेट संबंध ग्रामदैवतांशी आहे. महाराष्ट्र शासनाकडून या लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असून, या कलेतील योगदानासाठी कलावंतांना राज्य पुरस्कार आणि वृद्ध कलावंत मानधन दिले जाते, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोकणात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आणि 9 ते 11 फेब्रुवारीदरम्यान रत्नागिरीतील खेड येथे शासनातर्फे नमन कलेचा महोत्सव आयोजित करण्यात आलेला असताना, अशा प्रकारची वेबसिरिज प्रसारित होणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
Ban ‘Devkhel’ Web Series: Cultural Affairs Minister Ashish Shelar Urges CM for Immediate Action
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,