विशेष प्रतिनिधी
नागपूर : Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यात आता फक्त ७ नक्षली उरले आहेत. ३१ मार्च या डेडलाईन पूर्वीच नक्षलवाद संपुष्टात येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.Gadchiroli
गडचिरोलीत १९८० च्या सुमारास नक्षली प्रथम आले. सुरुवातीला नक्षल्यांचीच दहशत होती. परंतु आता केंद्र आणि राज्य सरकारांच्या कठोर भूमिकेमुळे देशातून तसेच महाराष्ट्रासह नक्षल प्रभावित राज्यातून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३१ मार्च या डेडलाईन पूर्वीच नक्षलवाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहे. कारण आता फक्त ७ नक्षली उरले आहेत. सी-६०, सीआरपीएफसह सुरक्ष दलाच्या झीरो टाॅलरन्समुळे नक्षल चळवळ जवळपास मोडीत निघाली आहे. नक्षलग्रस्त जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख बदलण्याचा निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्रिपदही स्वत:कडे ठेवले आहे. राज्य सरकारचे झीरो टाॅलरन्स धोरण आणि गडचिरोली पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षली संपत चालले आहे.Gadchiroli
महायुती सरकारने नक्षलवादावर झीरो टाॅलरन्सचे धोरण स्वीकारले. विशेषतः २०१४ ते २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाच्या विरोधात कठोर धोरण स्वीकारून महाराष्ट्र नक्षलमुक्त मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजना, सुरक्षा यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि गडचिरोलीसह नक्षलप्रभावित भागांत पायाभूत विकास, शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. स्थानिकांना विकासाचा लाभ थेट पोहोचवून नक्षलवादाच्या मुळावर प्रहार करण्यात आला.
६ जून २०२५ रोजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांना संविधानाची प्रत भेट दिली. १५ ऑक्टोबर २०२५ : ज्येष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमारे ६० कार्यकर्त्यांसह शस्त्रे सोडून आत्मसमर्पण केले. भूपतीच्या या आत्मसमर्पणामुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
Only 7 Maoists Left in Gadchiroli, Naxalism to End Before March 31: CM Confident
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- विमान अपघातप्रकरणी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चार तास चौकशी
- Government identity : तृतीयपंथांना सरकारी “ओळख”;कोणत्या योजनांचा मिळणार लाभ?
- CM Devendra Fadnavis : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प