चंद्रपूरमध्ये काॅंग्रेसला धक्यावर धक्के, महापाैरपद गेलेच पण उपमहापाैरपदाबाबत नशीबानेही दिली नाही साथ

विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीतून चंद्रपूर महानगरपालिकेत महापाैरपद गमवावे लागले. उपमहापाैरपदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाल्यावर नशीबानेही साथ दिली नाही. त्यामुळे काॅंग्रेसला लागाेपाठ दाेन धक्के बसले.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाल्यानंतर काही वेळातच झालेली उपमहापौरपदाची निवडणूक अधिकच अटीतटीची झाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३२ अशी समसमान मतं पडली. अखेरीस ईश्वरचिठ्ठीद्वारे झालेल्या निर्णयात चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाची माळ उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या गळ्यात पडली. Congress



चंद्रपूरमधील महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक अगदी काही तासांवर आली असतानाही येथील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नव्हता. अखेरीस भाजपा आणि उद्धवसेनेनेचे नगरसेवक एकत्र आल्याने येथील समीकरणे पूर्णपणे बदलून गेली. त्यात सुरुवातीला झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर या ३२ मते घेऊन विजयी झाल्या. तर ३१ मते मिळवणाऱ्या काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.Congress

महापौरपदाच्या निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपासाठी विजयाचं गणित जुळवणं सोपं गेलं. Congress

महापौरपदानंतर उपमहापौरपदासाठी झालेली निवडणूक आणखीनच रंगतदार झाली. या निवडणुकीसाठी उद्धवसेनेने प्रशांत दानव यांना उमेदवारी दिली होती. प्रशांत दानव हे आज सकाळीच उद्धवसेनेत आले होते. काँग्रेसने मित्रपक्षाच्या पप्पू देशमुख यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, मतदानावेळी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३२-३२ मते पडली. समसमान मते पडल्याने टाय झालेल्या या लढतीचा निर्णय लावण्यासाठी अखेरीस ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला. या ईश्वरचिठ्ठीमध्ये उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या बाजूने कौल लागला आणि ते उपमहापौरपदी विराजमान झाले.

Congress faces setbacks in Chandrapur, won the mayor’s post but luck didn’t favour it for the deputy mayor’s post either

महत्वाच्या बातम्या