Ajit Pawar : विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने प्रथमच गाठला पन्नासच्या पुढचा आकडा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ajit Pawar राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी मतरूपी श्रद्धांजली वाहिली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच पन्नासच्या पुढचा आकडा गाठता आला आहे. एकूण ७३ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत जिल्हा परिषदेत निर्विवाद बहुमत मिळवले आहे.Ajit Pawar

या निवडणुकीत भाजपला १० जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ला ६ आणि शिवसेना (शिंदे गट)ला ५ जागा मिळाल्या. शरद पवार गटाला केवळ १ जागेवर विजय मिळवता आला. काँग्रेस आणि मनसेला मात्र एकही जागा जिंकता आली नाही.Ajit Pawar

बारामती येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी येत असताना विमान कोसळून अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पुणे जिल्ह्यासाठी तर हा मोठा धक्का होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार अनेक ठिकाणी ठप्प झाला होता. कार्यकर्ते प्रचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते.Ajit Pawar



मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागांवर विजय मिळवत ‘क्लीन स्वीप’ केला.

बारामती आणि इंदापूर हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले मानले जातात. या दोन्ही तालुक्यांमध्ये पक्षाने दमदार विजय नोंदवत आपला मजबूत आधार पुन्हा एकदा सिद्ध केला.
या निकालामुळे भाजप आणि दोन्ही शिवसेना गटांना मोठा धक्का बसला आहे. समन्वयाचा अभाव, मतविभागणी आणि स्थानिक नेतृत्वाची कमजोरी या बाबी विरोधकांसाठी अडचणीच्या ठरल्या. विशेषतः शरद पवार गटासाठी हा निकाल अधिक वेदनादायी मानला जात असून, पक्षफुटीनंतरही जिल्ह्यातील जनाधार अजित पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा हा निकाल आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीही महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. जिल्ह्यात विकास, निर्णायक नेतृत्व आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या राजकारणाला मतदारांनी पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हा परिषद निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ५१
भाजप: १०
शिवसेना (उद्धव ठाकरे गट): ६
शिवसेना (शिंदे गट): ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): १
मनसे: ०
एकूण जागा: ७३

Votes as Tribute to Ajit Pawar: NCP Crosses 50-Seat Mark in Pune District for First Time

महत्वाच्या बातम्या