पवार कुटुंबात सनई-चौघडे, रेवती सुळे यांचा ठरला विवाह

विशेष प्रतिनिधी

पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह सारंग लखानी यांच्याशी निश्चित झाला आहे. सारंग हे नागपूर येथील विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.व्यवसायाबरोबरच सारंग लखानी हे क्रीडाक्षेत्रातही सक्रिय असून, ते एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.Revati Sule

सुळे आणि लखानी कुटुंबांमधील ही सोयरिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जुळली आहे.Revati Sule



माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देत ही माहिती शेअर केल्यानंतर हा विषय सार्वजनिक झाला. मात्र विवाह सोहळ्याचे ठिकाण आणि वेळापत्रकाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सुप्रिया सुळे आणि सदानंद यांना रेवती आणि विजय अशी दोन मुले आहेत. रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात रेवती सुळे या राजकारणात सक्रिय नाहीत, मात्र गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली, त्यावेळी रेवती सुळे बारामतीत प्रचारात सहभागी झाल्या होत्या. Revati Sule

Wedding Bells In Pawar Family, Revati Sule’s Marriage Finalised

महत्वाच्या बातम्या