Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

गोकुळच्या ‘ हलाल प्रमाणपत्र ‘ वरून नाव वाद; निवडणुकीआधी राजकारण तापलं

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने आपल्या काही दुग्धजन्य उत्पादनांसाठी घेतलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’वरून जिल्ह्यात नवा वाद निर्माण झाला आहे. आगामी गोकुळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर निशाणा साधला आहे. दुग्धजन्य पदार्थांसाठी हलाल प्रमाणपत्राची गरज काय, असा सवाल उपस्थित करत विरोधी गटाने गोकुळ प्रशासनावर टीका केली आहे.

मुंबई, महाराष्ट्र

महाविकास आघाडी विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार, दोन दिवसात अंतिम निर्णय, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

पुणे

पुण्यात जनगणना कामाचा वेग मंदावला; पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये..

जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुणे महापालिकेने कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे.जनगणनेच्या कामात दांडी मारणाऱ्या, काम टाकणाऱ्या किव्वा नियुक्ती असूनही कामावर हजर न राहणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.

पुणे

पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; शहर विरुद्ध ग्रामीण वाद पेटला?

आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीतील अंतर्गत राजकारण तापले आहे.पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चढाओढ सुरू आहे.मात्र आता राष्ट्रवादीत अजित पवार गटात ‘ शहर विरुद्ध ग्रामीण ‘ असा संघर्ष देखील सुरू असल्याचे बोलले जात आहे.

पुणे

सार्वजनिक ठिकाणी पशुबळी कार्यक्रमांवर कारवाई करा, माधुरी मिसाळ यांची मागणी

शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृतरित्या पशुबळी व कत्तलीचे प्रकार आयोजित केले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुणे

वाहतूक कोंडीवर मोठा उपाय! पुण्यात उभारणार ५४ किलोमीटरचे अंडरग्राऊंड रोड नेटवर्क

वाढती लोकसंख्या, झपाट्याने विस्तारत असलेली आयटी हब्स आणि दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर पुण्यासाठी एक महत्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प पुढे येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून पुण्यात तब्बल ५४ किलोमीटरचे भूमिगत रस्ता नेटवर्क उभारण्याची तयारी सुरू असून, या प्रकल्पाला ‘पाताळ लोक’ असे नाव देण्यात आले आहे.

Mangal Prabhat Lodha
मुंबई

Mangal Prabhat Lodha : मुंबईत वर्षभर राबवले जाणार नशा मुक्ती अभियान; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक

नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नशा मुक्ती अभियान अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

Sunetra Pawar
मुंबई

Sunetra Pawar : अर्थखात्यावरून राष्ट्रवादीत नाराजी? देवगिरीवरील बैठकीत सुनेत्रा पवारांची उघड खंत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि अस्वस्थतेच्या चर्चांना आता अधिकच जोर आला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जात नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना पक्षात निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.

Sanjay Rathod
मुंबई

Sanjay Rathod : मंत्रालयातच ‘हातसफाई’! मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून ८० हजार रुपये गायब

मंत्रालयात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून ८० हजार रुपयांची हातसफाई केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याऐवजी मंत्रालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

Nitesh Rane
मुंबई

Nitesh Rane : राहुल गांधी पाकिस्तानी एजंट, बाॅसला खुश करण्यासाठी माेदींवर टीका, नीतेश राणे यांचा निशाणा

राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकमध्ये बसलेल्या आपल्या बॉसला खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलतात, अशी जहरी टीका भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्र

महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठा निर्णय; महाराष्ट्रात ‘एकल महिला धोरण’ लागू करण्याची तयारी

राज्यातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, अविवाहित तसेच कुटुंबाचा संपूर्ण भार एकट्याने सांभाळणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र ‘एकल महिला धोरण’ तयार करण्यात येत असून, या धोरणाच्या मसुद्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

देश-विदेश

एस.जयशंकर यांच्या व्हिडिओतील वक्तव्यात फेरफार केल्याचे उघड !

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘कॉकरोच पार्टी’ संदर्भात वक्तव्य केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओतील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.