विशेष प्रतिनिधी
पुणे: जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुणे महापालिकेने कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे.जनगणनेच्या कामात दांडी मारणाऱ्या, काम टाकणाऱ्या किव्वा नियुक्ती असूनही कामावर हजर न राहणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील जनगणना कामाचा आढावा घेताना अनेक विभागात अत्यंत संथ गतीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.महापालिकेच्या सुमारे ६० टक्के गटांमध्ये काम सुरू झाले आहे.मात्र, ४० टक्के गटांमध्ये कामाला सुरुवात झालेली नाही.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘ राष्ट्रीय कर्तव्य कोणत्याही प्रकारची कसूर खपवून घेतला जाणार नाही ‘. नियुक्त कर्मचारी कामावर हजर राहत नसल्यास संबंधित कार्यालय प्रमुखांना देखील जबाबदार धरले जाणार आहे.
या भागात संथ गतीने काम..
महापालिकेच्या नगर रोड, येरवडा – वाघोली, ढोले पाटील रोड, औंध – बाणेर आणि सिंहगड रोड या भागात क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनगणनेच्या कामाची गती संथ असल्याचे समोर आले.पुढील दोन दिवसार उर्वरित गटांचे काम सुरू करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपाययोजना राबवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि सेवकवर्गातील काही कर्मचारीही जनगणनेच्या कामावर रुजू झाले नाहीत.या कर्मचाऱ्यांना तत्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून आदेशाचे पालन न केल्यास निलंबन किंवा फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
The pace of census work in Pune has slowed down; Pune Municipal Corporation is in action mode
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश