Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तेजस शहा नेमका कोण?

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून पुण्यातील फिजिक्स शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील डॉक्टर ‘अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’ मध्ये फिजिक्स विषय शिकवणाऱ्या तेजस हर्षदकुमार शहा हा पेपरफुटी प्रकरणात महत्वाचा दुआ असण्याचा संशय सीबीआयकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे

राष्ट्रवादीत पुणे विधानपरिषदेवरून हालचाली; पार्थ पवार ठरवणार उमेदवार?

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या पुण्याचा जागेवरून भाजपा आणि राष्ट्रवादीत दुमत असेल तरी, राष्ट्रवादी कडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.पुण्याचा विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवाराची निवड खासदार पार्थ पवार करणार आहेत.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पार्थ पवारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.

पुणे, महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा

“मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचे कवडीचेही ज्ञान नसलेल्या माणसाच्या हातात गेलेला पोरखेळ आहे. सरकारने त्यांच्यासाठी नेहमीच ‘रेड कार्पेट’ घातले असून, त्यांच्या दबावाखाली येऊन काढलेले सरकारी नोटिफिकेशन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मनोज जरांगे यांची मागणी कायद्याच्या कसोटीवर कधीही टिकणार नाही,” अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

मुंबई, महाराष्ट्र

एका व्यक्तीचा उदोउदो सावरकरांना नव्हता मान्य, राज ठाकरे यांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होते असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र, पुणे

एकतर सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा, मनाेज जरांगे यांचा इशारा

आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही. एकतर सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तुकडा पडेल या भूमिकेवर मी आलो आहे, असा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

पुणे

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा अखेर संपणार? जुलैमध्ये सेवा सुरू होण्याची शक्यता

शहरातील बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी पावसाळ्यातील मुहूर्त निघणार आहे

local body elections
महाराष्ट्र

local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती व महानगरपालिका निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांवर २६ मे २०२६ पासून पुढील ३ वर्षासाठी अपात्र केल्याचे आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी जारी केले आहेत. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Tukaram Mundhe
मुंबई

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका; राज्यभरात अन्न भेसळखोरांवर कारवाईची मोहीम

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग कारवाया करून निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अन्न सुरक्षेबाबत प्रशासन आता अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Amruta Fadnavis
मुंबई

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचे इंधन बचतीसाठी पाऊल, पाच – सात किलोमीटर प्रवास सायकलवर करणार

विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल केला असून, आता घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरातील दैनंदिन कामांसाठी त्यांनी थेट सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

Bakrid
मुंबई

Bakrid : बकरी ईदमुळे मुंबईत हाय अलर्ट; १० हजारांहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलिस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

पुणे

बंटी पाटील यांच्या बदनामीच्या फ्लेक्सप्रकरणी काँग्रेस आक्रमक; कारवाईसाठी पोलिसांकडे धाव!

शहरात काँग्रेस नेते बंटी पाटील यांची बदनामी करणारे फ्लेक्स लावण्यात आल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या प्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पुणे

जामिनावर सुटताच विशाल अगरवालचा जल्लोष? व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल कारागृहातून सुटताच अगरवाल कुटुंबाने जंगी पार्टी आयोजित केल्याचे बोलले जात आहे.