विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी पावसाळ्यातील मुहूर्त निघणार आहे.हिंजवडीतील असलेल्या राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याचा मध्यस्थी भागाशी जोडणारा हा मेट्रो प्रकल्प आहे.या प्रकल्पामुळे हजारो आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुणे महामेट्रो प्रकल्पाची तिसरी महत्त्वाची मार्गिका आहे.शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक – खासगी भागीदारीत पुणे प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीसोबत राबवण्यात आला आहे.
मुहूर्त रखडलेलाच..
शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो मार्गे का मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते.मात्र, मार्गिकेचे आणि स्थानकांचे काम अपूर्ण असल्याने मार्गिका सुरू झाली नाही.काहीदिवसांपूर्वी हिंजवडी ते बाणेर दरम्यान पारस स्थानकांपर्यंत 15 जून पासून मेट्रो सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते.मात्र, नियोजन फसले असून, जुलै महिन्यात मुहूर्त लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. हिंजवडी पासून ते बाणेर पर्यंत असलेल्या स्थानकांचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे. मे महिन्याचा अखेरीस आणि जून महिन्याच्या सुरुवातीला मेट्रो मार्गिकेची संपूर्ण पाहणी पूर्ण होईल.या तपासणीनंतर आयुक्तांकडून मेट्रो सेवा सुरू करण्याची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास एक महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे.त्यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग जुलैमध्ये सुरू होणार असल्या तरी, तारीख मात्र अजूनही निश्चित करण्यात आलेली नाही.
Will the wait for Hinjewadi to Shivajinagar Metro finally end? Service likely to start in July
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश