पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; शहर विरुद्ध ग्रामीण वाद पेटला?

विशेष प्रतिनिधी

पुणे: आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीतील अंतर्गत राजकारण तापले आहे.पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चढाओढ सुरू आहे.मात्र आता राष्ट्रवादीत अजित पवार गटात ‘ शहर विरुद्ध ग्रामीण ‘ असा संघर्ष देखील सुरू असल्याचे बोलले जात आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात येतोय.पुणे जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३७० सदस्यांचे संख्याबळ असल्याचे सांगत राष्ट्रवादीने पुण्याचा जागेबाबत आग्रही भूमिका घेतली आहे.

ग्रामीण भागाला संधी देण्याची मागणी…

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघातून आत्तापर्यंत शहरी भागाचा विचार केला गेला असल्याचे सांगत,आता ग्रामीण भागाला संधी देण्यात यावी, असा आग्रह ग्रामीण भागातील माजी आमदारांनी धरला आहे.मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पक्षाला पुन्हा आघाडीवर नेण्यासाठी शहरातील माजी आमदार उमेदवारीची मागणी करत आहेत.



पुण्यात भाजपला स्थानिक आघाड्यांची साथ?

पुणे शहरात मागच्या ५ वर्षात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भाजपाकडे ३०९ सदस्यांचे संख्याबळ आहे.मात्र दौंड येथील ‘ नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे ‘ आणि इंदापूरमधील ‘ कृष्ण भीमा विकास आघाडी ‘ च्या ७ सदस्यांचा पाठिंबा असल्यामुळे ३३३ जागा असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

राष्ट्रवादी मधील इच्छुक कोण?

राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवण्यासाठी पुणे शहरातील वडगावशेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे, पिंपरी चिंचवड शहरातील माजी आमदार विलास लांडे, नाना काटे तर ग्रामीण भागातून माजी आमदार रमेश थोरात आणि दिलीप मोहिते हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Rivalry within NCP for Pune Legislative Council; City vs. rural dispute erupts?

महत्वाच्या बातम्या