Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Voters
मुंबई

Voters : मतदानाच्या दिवशी मतदानासाठी सुट्टी, सवलत न दिल्यास कारवाईचा इशारा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या दिवशी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचे अध्यादेश निर्गमित केले आहेत.

Jayant Patil
मुंबई

Jayant Patil : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव पुन्हा एकदा सुरू, जयंत पाटील यांचा आरोप

साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती, त्याचा राग आजही काहींच्या मनात जिवंत आहे, हे विसरू नका. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव पुन्हा एकदा सुरू झाला असून मराठी माणसाने सावध राहण्याची गरज असल्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केले.

Raghavendra Bappu Mankar
पुणे

Raghavendra Bappu Mankar : पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार: राघवेंद्र बाप्पु मानकर

जुन्या वाड्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाडे व सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर शाश्वत उपाय म्हणून ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. प्रभाग २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) परिसरात प्रचारार्थ नागरिकांशी संवाद फेरीदरम्यान ते बोलत होते.

Bappu Mankar
पुणे

Bappu Mankar : तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार : बाप्पु मानकर ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करणार

आजवर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली. प्रभाग क्रमांक २५ मधील प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा शब्द दिला.

CM Fadnavis
पुणे

CM Fadanvis : पुण्यावर प्रेम, पण निवडणूक नागपूरमधूनच, मुख्यमंत्र्यांनी दिला चर्चांना पूर्णविराम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याबाबत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण पुण्यातून निवडणूक लढवणार नसून नागपूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Fadnavis
महाराष्ट्र

Fadnavis : राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंवर निशाणा

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वातावरण तापले आहे. नाशिकमध्ये झालेल्या संयुक्त सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. “मुख्यमंत्री नाशिक दत्तक घेतो म्हणाले, पण हा बाप परत फिरकलाच नाही,” असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. या टीकेला आता फडणवीसांनी थेट उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगेमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Ladki Bahin
महाराष्ट्र

Ladki Bahin : काँग्रेसच्या राजकारणामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत झाली कडू!

काँग्रेसच्या निवडणुकीच्या राजकारणामुळे लाडक्या बहिणींची (Ladki Bahin) संक्रांत कडू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संक्रांतीच्या काळात हप्ता देऊ नये अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

Nitesh Rane
मुंबई

Nitesh Rane : अमित आणि आदित्य बेरोजगार होऊन जातील भीतीने ठाकरे बंधू एकत्र, नितेश राणे यांचा टोला

आपण एकत्र आलो नाही तर अमित आणि आदित्य दोघेही बेरोजगार होऊन जातील, या भीतीने हे दोन भाऊ आता एकत्र आले आहेत.अदा टोला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.

Doctor Sangram Patil
मुंबई

Doctor Sangram Patil : लंडनस्थित डॉ. संग्राम पाटलांना मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात

आपल्या निर्भीड राजकीय मतांसाठी आणि कोरोना काळात केलेल्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध असलेले लंडनस्थित डॉ.संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अनपेक्षित कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.

Thane Civic Polls;
महाराष्ट्र

Thane Civic Polls; : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक कारवाई; बेहिशोबी रोकड, अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी ठाणे पोलिसांनी कडक सुरक्षा उपाययोजना राबवत मोठी कारवाई केली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड, अमली पदार्थ, अवैध दारू तसेच घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.