विशेष प्रतिनिधी
मुंबई : Doctor Sangram Patil आपल्या निर्भीड राजकीय मतांसाठी आणि कोरोना काळात केलेल्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध असलेले लंडनस्थित डॉ.संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अनपेक्षित कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.Doctor Sangram Patil
डॉ. पाटील यांना नेमक्या कोणत्या कारणास्तव रोखण्यात आले, याचा खुलासा अद्याप पोलिसांनी केलेला नाही, मात्र या कारवाईचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Doctor Sangram Patil
डॉ. संग्राम पाटील हे व्यवसायाने डॉक्टर असून लंडनमध्ये स्थायिक आहेत. कोरोना महासाथीच्या काळात जेव्हा जगभरात भीतीचे वातावरण होते, तेव्हा डॉ. पाटील यांनी आपल्या ‘Dr Sangram G Patil’ या युट्युब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून लाखो लोकांना धीर देण्याचे काम केले होते. विज्ञानावर आधारित माहिती आणि खरी परिस्थिती मांडत असतानाच त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अनेकदा सडेतोड टीका केली होती. याच कारणावरून त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर काही काळ निर्बंधही घालण्यात आले होते, ज्याचा खुलासा त्यांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे केला होता.Doctor Sangram Patil
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. संग्राम पाटील यांच्या अटकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारतात लोकशाही जिवंत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटलांना मुंबई विमानतळावर येताक्षणीच अटक करणे अत्यंत दुर्दैवी आहे. ही कारवाई आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी आहे. मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने डॉ. पाटलांना नेमकी कोणत्या कारणास्तव अटक केली, याचा तातडीने खुलासा करावा. काँग्रेस पक्ष या दडपशाहीचा जाहीर धिक्कार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
अॅड. असीम सरोदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले, संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले. आत्ताच त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजतापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवलेले आहे. खरे तर हे अन्याकारक आहे आणि छळवाद आहे. संग्राम पाटील हे लंडन मध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझे भाषण आयोजित केले होते. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल असे दिसते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील. पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये. आशा करूया की संग्राम पाटील यांना अटक करण्यात येणार नाही, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
UK-Based Doctor Sangram Patil Detained at Mumbai Airport
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत भाजपकडून २६ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन
- मांजरी-केशवनगर परिसरामध्ये शिवसेनेकडून १०० कोटींची कामे
- Lahu Balwadkar : बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांचा लहू बालवडकरांना जाहीर पाठिंबा
- प्रभाग २४ मध्ये बिडकरांचा सक्रिय प्रचार; मॉर्निंग वॉकमध्ये ज्येष्ठ-महिला-खेळाडूंना दिली विकासाची हमी