Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांना दिलासा, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप : याचिका ऐकण्यास उच्च न्यायालायाचा नकार
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयाने ऐकण्यास नकार दिला. निवडणूकीच्या तीन दिवस आधी याचिका करण्यात आल्याने त्यावनर तातडीने सुनावणी घेणे शक्य नसल्याचे न्यायालयाने याचिका ऐकण्यास नकार देताना नूद केले.











