Chandrashekhar Bawankule : त्यांची पार्टी किंचित – किंचीत होत चाललीय, चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Chandrashekhar Bawankule महापालिका निवडणुकीच्या रणांगणात ठाकरे बंधूंच्या प्रचाराची दिशा आणि फोकस चुकत आहे. उद्धव व राज ठाकरे यांच्या प्रचाराची दिशा चुकत असल्याचे मी वारंवार सांगत आहे. मी फार लहान माणूस आहे. मी त्यांना सल्ला देणार नाही. पण त्यांची पार्टी किंचित – किंचीत होत चालली आहे, असा टाेला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.Chandrashekhar Bawankule

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करत आहेत. त्यांना विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे. राज व उद्धव यांना मी वारंवार सांगतो की, ते चुकत आहेत. त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकत आहे. प्रचाराचा फोकस चुकत आहे. या पद्धतीने त्यांनी अनेकदा मतदान मागितले. पण काहीच मिळाले नाही. आता विकासावर बोलले तरच मतदान मिळते. मी या यंत्रणेतील फार लहान व्यक्ती आहे. मी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना सल्ला देणार नाही. पण त्यांची पार्टी किंचित – किंचित होत चालली आहे.Chandrashekhar Bawankule



ठाकरेंचा पक्ष लहान होण्याचे कारण असे आहे की, त्यांच्या प्रचाराची दिशाच चुकत आहे. त्यांनी निवडलेले विषय चुकत आहेत. त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकत आहे. त्यामुळेच त्यांची अधोगती होत आहे. माझ्या मते, मुंबईच्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाची अधोगती दिसून येईल. कारण, ते निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर चालणार आहे. विकास म्हणजे फडणवीस व फडणवीस म्हणजे विकास हे लोकांना माहिती आहे. लोकं आता या विषयाला घेऊन मतदान करणार नाहीत. ठाकरे प्रत्येकवेळी मुंबई तोडण्याचे भूत उभे करतात. पण त्याचे काहीच होत नाही. आता म्हणतात मराठी अस्मिता. पण मतदार त्यांचे काहीही ऐकत नाहीत, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंशी चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले आहे. पत्रकारांनी याविषयी बावनकुळेंना छेडले असता ते म्हणाले, लोकांनी अडीचवर्षे आदित्य ठाकरेंना पाहिले व फडणवीसांनाही पाहिले. त्यांनी विकासावर न बोललेले बरे. विकास हा असा नसतो. विकास हा जन्मापासूनच जनतेच्या सेवेत आपले आयुष्य द्यावे लागते. सोन्याच्या चमचाने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासावर बोलूच शकत नाहीत. त्यांना मुंबई व महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे कळत नाही. आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी कशी करणार? महाराष्ट्राच्या व मुंबईच्या जनतेला तरी हे मान्य आहे का? आदित्य ठाकरेंनाही हे मान्य आहे का? काहीतरी पोकळ गप्पा मारून विषय भरकटवायचा असा हा प्रकार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Their party is gradually becoming weaker, Chandrashekhar Bawankule targets Thackeray brothers

महत्वाच्या बातम्या