Namdeo Dhasal : व्हिडिओ कॉलवर संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांचा नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका यांना आधार
सुप्रसिद्ध कवी, लेखक, दलित चळवळीतील कार्यकर्ते स्व.पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नाव शाहीर अमर शेख यांच्या कन्या मल्लिका नामदेव ढसाळ या सध्या आजारी आहेत. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही, नानाजी देशमुख प्रतिष्ठानतर्फे त्यांना मदत केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी व्हीडिओ कॉलवर संवाद साधला आहे.











