Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मेंदूत केमिकल लोच्या, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंच्या मेंदूत केमिकल लोच्या झाला आहे. निवडणूक आयोगावर आक्षेप घेणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेला गतिरोधक ठरवण्यासारखं आहे. आयोगावर संशय व्यक्त करणे हे निवडणूक प्रक्रियेवरच अविश्वास दाखवण्यासारखं आहे. तसेच मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आरोप करणं कितपत योग्य आहे? असा सवाल भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केला.Uddhav Thackeray

आशिष शेलार म्हणाले की, मतदान सुरू असताना अशा प्रकारचे आरोप केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता डागाळण्याचा प्रयत्न होतो. जर आरोप खरे असतील तर त्याबाबत अधिकृत तक्रार का करण्यात आली नाही? केवळ माध्यमांसमोर आरोप करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.Uddhav Thackeray



आशिष शेलार म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत चौकटीवरच आघात करणं आहे. आयोगाने ठरवलेल्या प्रक्रियेनुसार मतदान सुरू आहे आणि त्यात त्रुटी असल्यास कायदेशीर मार्गाने त्यावर कारवाई करता येते. मात्र, सतत संशयाचं वातावरण तयार करून निवडणुकीचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा देतानाच आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगावर आरोप करणारे स्वतःच निवडणुकीत पराभवाची मानसिकता बाळगून आहे.

शाई पुसण्याच्या प्रकरणावर बोलताना आशिष शेलार यांनी म्हटले की, शाई पुसणारे लोक बोगस मतदान करून पाहत होते. त्यामुळे अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच निवडणूक प्रक्रियेची पवित्रता राखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. कारण शाई पुसली जाते म्हणून गोंधळ घालणाऱ्यांचा खरा हेतू काय होता, हे तपासण्याची गरज आहे. त्यामुळे शाई पुसण्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांकडून कायदेशीर मार्ग स्वीकारण्याऐवजी राजकीय गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Chemical Locha in Uddhav Thackeray’s Mind, Ashish Shelar Launches Sharp Attack

महत्वाच्या बातम्या