विशेष प्रतिनिधी
नागपूर : Mohan Bhagwat लोकशाहीत बदल घडवायचा असेल तर सक्रिय सहभाग आवश्यक आहे. केवळ असहमती नोंदवून थांबणे हा दीर्घकालीन उपाय नाही, असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी दिला.
नागपूरच्या महाल परिसरातील मतदान केंद्रावर भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नोटा निवडल्याने आपण सर्व उमेदवारांना नाकारतो, मात्र त्याचा परिणाम असा होतो की अप्रत्यक्षपणे अशा उमेदवाराला फायदा होतो, ज्याला लोकांची खरी पसंती नाही, असे त्यांनी सांगितले. नोटा म्हणजे आपण सगळ्यांनाच नाकारतो आणि त्यामुळे असा व्यक्ती पुढे येतो, ज्याला कोणीही खरोखर निवडू इच्छित नाही.
भागवत म्हणाले, नोटा हा पर्याय नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी देतो, हे मान्यच आहे. मात्र, कोणालाही मत न देण्यापेक्षा उपलब्ध पर्यायांमधून योग्य उमेदवार निवडणे हे अधिक जबाबदार आणि लोकशाहीस पोषक ठरेल. निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य प्रक्रिया आहे. लोकशाही केवळ मतदानाच्या अधिकारावर उभी नाही, तर त्या अधिकाराच्या जबाबदारीवर उभी आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे, कारण मत न देणे म्हणजे लोकशाहीपासून दूर राहणे. आज मी सर्वात पहिलं काम मतदानाचंच केलं, असे सांगत त्यांनी स्वतःचा अनुभव मांडला आणि इतर मतदारांनाही मतदानासाठी प्रेरित केले.
जनहिताचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन करताना कोणत्याही भावनिक किंवा तात्कालिक मुद्द्यांवर न अडकता, पात्र, योग्य आणि समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे, असे भागवत यांनी सांगितले. मतदान हा केवळ अधिकार नसून तो समाज आणि देशाच्या भविष्यासाठी घेतला जाणारा निर्णय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे प्रत्येक मतदाराने विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
Currency Notes Are Not the Answer to Change in Democracy, Says RSS Chief Mohan Bhagwat
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन