Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : तुमचे नगरसेवक सांभाळून ठेवा, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. नवीन नगरसेवकांना आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेलमध्ये एकत्र ठेवले होते. त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Amol Mitkari
मुंबई

Amol Mitkari : आगामी सर्व निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घ्या, पराभवानंतर अमोल मिटकरी यांची मागणी

महापालिका निवडणुकीत पानिपत’ झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी सर्व निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घेण्याची मागणी केली आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे मिटकरी म्हणाले.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : नासके लोक सोबत ठेवल्यामुळे मराठा समाजाने शिकवला धडा, मनोज जरांगे यांचा अजित पवारांना टोला

अजित दादांनी रक्ताने माखलेले आणि नासके लोक सोबत ठेवल्यामुळे मराठा समाजाने त्यांना पुण्यात धडा शिकवला, असा आरोप मराठा आंदोलक मनेाज जरांगे यांनी केला.

Fadnavis
पुणे

Fadnavis : ‘देवानेच ठरवलंय, महायुतीचाच महापौर’ फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; शिंदेंसोबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट

बई महापालिकेच्या महापौरपदावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिश्किल पण बोचरा टोला लगावला आहे. “देवाच्या मनात असेल तर मुंबई आपली होईल,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

Varsha Gaikwad
मुंबई

Varsha Gaikwad : काँग्रेसमध्ये घमासान वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी; भाई जगतापांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला असून, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यावरून भाई जगताप यांना बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस यामुळे पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

मुंबई

Raj Thackeray : अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती लढाई, राज ठाकरे यांनी केले कार्यकर्त्यांच्या झुंजीचे कौतुक

Raj Thackeray : अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण लढाई केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्र यासाठीची ही दीर्घकालीन लढाई आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे किंगमेकर

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्ष (भाजपा) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ एमआयएम आहे. राज्याच्या सत्तेत सोबत असलेले मात्र महापालिकेत एकमेकांविरोधात लढलेली शिदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. मात्र त्यांच्याशिवाय भाजपला महापौर करता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे किंगमेकर ठरणार आहेत.

Amit Deshmukh
महाराष्ट्र

Amit Deshmukh : लातूरने राखली काँग्रेसची लाज, काँग्रेसचे स्वबळावर 47 जागा जिंकत वर्चस्व

राज्यभरात अनेक ठिकाणी काँग्रेसला धक्के बसत असताना लातूर महानगरपालिकेने काँग्रेसची राजकीय लाज वाचवली असल्याचं चित्र आहे. 70 जागांच्या लातूर महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर 47 जागा जिंकत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. याउलट भाजपला 22 मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : विकासविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारले, एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना टोला

निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी भावनिक मुद्दे, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विविध प्रकारचा प्रचार करण्यात आला. मात्र, मुंबईकरांनी आणि राज्यातील मतदारांनी भावनिकतेपेक्षा विकासालाच कौल दिला आहे. विकासविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारले असून, विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Amol Balwadkar
पुणे

Amol Balwadkar : अमोल बालवडकर यांनी खेचून आणला विजय, 650 मतांनी विजयी

पुणे महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बाणेर बालेवाडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर यांनी भारतीय जनता पक्षाचे लहू बालवडकर यांचा पराभव केला आणि विजय अक्षरशः खेचून आणला. अमोल बालवडकर यांनी लहू बालवडकर यांचा 650 मतांनी पराभव केला.

Murlidhar Mohol
पुणे

Murlidhar Mohol : पुणेकरांच्या अपेक्षांना जबाबदारीने सामोरे जाऊ, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार निवडून दिल्याबद्दल मी सर्व पुणेकरांचे मनापासून आभार मानतो. मतदान करताना पुणेकरांनी शहराच्या विकासाला, प्रगतीला आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला प्राधान्य दिले. हीच भावना लक्षात घेऊन आम्ही सत्ता केवळ उपभोगण्यासाठी नव्हे, तर पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जबाबदारीने काम करू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी केले.

Mamata Banerjee
देश-विदेश

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, तृणमूल काँग्रेसची ईडीविरोधातील याचिका निकाली

कोलकाता हायकोर्टाने बुधवारी तृणमूल काँग्रेसची (टीएमसी) ती याचिका निकाली काढली, ज्यामध्ये पक्षाने आपल्या डेटाच्या सुरक्षेची मागणी केली होती. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी ८ जानेवारी रोजी ईडीने कथितपणे जप्त केलेल्या वैयक्तिक आणि राजकीय डेटाच्या संरक्षणासाठी कोर्टात पोहोचली होती. यापूर्वी ईडीच्या वतीने हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी कोर्टाला सांगितले की, एजन्सीने कोणतीही कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केलेले नाही.