विशेष प्रतिनिधी
बीड : Manoj Jarange अजित दादांनी रक्ताने माखलेले आणि नासके लोक सोबत ठेवल्यामुळे मराठा समाजाने त्यांना पुण्यात धडा शिकवला, असा आरोप मराठा आंदोलक मनेाज जरांगे यांनी केला.Manoj Jarange
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, अजित पवारांनी नासके लोक आपल्यासोबत ठेवल्यामुळे त्यांना मराठ्यांचे मतदान पडलं नाही. अजित दादा पण असे लोक सांभाळतो, त्यामुळे लोक लांब चालले आहेत, त्यांना आता कळाले. पापी लोक, रक्ताने माखलेले लोक सोबत ठेवले, तर असे परिणाम भोगावे लागतील.Manoj Jarange
अजित दादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचे मतदान सुद्धा पडले नाही. नाहीतर पुण्यात अजित दादाला इतके कमी यश भेटलं नसतं. भाजप त्या लोकांना का जवळ करत नाही, यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं. दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. त्यामुळे महानगरपालिकेला केवळ मराठ्यामुळेच पडावे लागले.
भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी उपरोधिक टोला लगावला. “भाजपवाले खूप मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता सोबत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचाही काटा काढला आहे. या लोकांनी बघायला काही शिल्लकच ठेवले नाही,” असे ते म्हणालेत.
एमआयएमच्या यशाबद्दल देखील मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली. मुसलमान, दलित, मराठे एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणूनच मी दलित मुस्लिम आणि मराठ्यांना सांगत असतो की, यांना एकदा पायाखाली चेंगरा. 2029 च्या निवडणुकीत चेंगरतील असे दिसते, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“Maratha Community Taught a Lesson for Siding With the Wrong People,” Manoj Jarange Jabs Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान