विशेष प्रतिनिधी
पुणे : यंदाच्या महापालिका निवडणुकीत पूर्व पुण्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवत सुरेंद्र पठारे यांनी आपली ताकद ठळकपणे सिद्ध केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी केवळ वैयक्तिक विजय मिळवला नाही, तर दोन्ही पॅनलमधील सर्व आठही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवले. या निकालामुळे पूर्व पुण्यातील राजकारणात सुरेंद्र पठारे यांच्या रूपाने नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.
पूर्व पुण्यात प्रथमच भाजपचे कमळ इतक्या मोठ्या प्रमाणात फुलले असून, या यशामागे पठारे यांची अचूक रणनीती, संघटन कौशल्य आणि प्रभावी जनसंपर्क निर्णायक ठरला आहे. सुरेंद्र पठारे हे प्रभाग क्रमांक ४ मधून तब्बल १६ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
सांस्कृतिक नगरीत उपनगरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाल्यानंतर हा ग्रामीण पट्टा दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र यंदा भाजपने या भागावर विशेष लक्ष केंद्रित करत नव्या चेहऱ्यांना संधी देत संघटन मजबूत करण्यावर भर दिला. याच पार्श्वभूमीवर सुरेंद्र पठारे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत प्रभाग क्रमांक ३ आणि ४ ची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली.
उच्च शिक्षित, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या पठारे यांनी तळागाळापर्यंत पोहोचत मतदारांचा विश्वास संपादन केला. पूर्व पुण्याच्या विकासाचा स्पष्ट आणि प्रभावी आराखडा मांडत त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. परिणामी पत्नी ऐश्वर्या पठारे यांच्यासह संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आले. त्यामुळे पठारे कुटुंबाचा राजकारणातील प्रवेश औपचारिक न राहता प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूर्व पुण्यात भाजपची ताकद मर्यादित मानली जात असताना मिळवलेले हे यश पक्षासाठी मैलाचा दगड ठरले आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणासोबतच आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या रणनीतीला नवे बळ मिळाले आहे.
राजकारणात नव्याने पदार्पण करणाऱ्या सुरेंद्र पठारे यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रभावी कामगिरी करत पूर्व पुण्याचा नवा ‘धुरंदर’ अशी ओळख निर्माण केली आहे. मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर केंद्रित नियोजन आणि तरुण कार्यकर्त्यांच्या सहभागातून उभारलेली संघटनात्मक बांधणी हेच या विजयाचे प्रमुख सूत्र असल्याचे त्यांनी विजयानंतर सांगितले.
New Chapter in East Pune Politics as Surendra Pathare Delivers Strong Performance Through Strategy and Grassroots Outreach
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मेंदूत केमिकल लोच्या, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
- शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
- शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा हा विकास आहे का? राज ठाकरे यांचा संतप्त सवाल
- निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी, देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला