विशेष प्रतिनिधी
नागपूर : काही लोकं उद्याचा निकाल फ्रेम करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. Devendra Fadnavis
मतदानावेळी शाहीच्या ऐवजी मार्कर पेन वापरण्यात येत आहे आणि तो पुसला जात असल्याचा राज ठाकरे यांनी आरोप केला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. यापूर्वीही अनेकवेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतं की, काही लोकं उद्याचा निकाल फ्रेम करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की, मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही तर ते आपलं कर्तव्य देखील आहे. मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे. म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो की, सर्वांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं. चांगलं मतदान झालं तर चांगले लोकं निवडून येतात. त्यांनेच विकास होतो. चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो की, मोठ्या प्रमाणात मतदान करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
Preparing to Shift Blame After Results, Devendra Fadnavis Takes a Dig at Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन