Nitin Nabin : नितीन नबीन यांनी मोडला अमित शाह यांचा विक्रम, भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष
Nitin Nabin नितीन नबीन हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. ४५ वर्षीय नबीन यांनी अमित शाह यांचा विक्रम मोडला आहे.अमित शाह ४९ वर्षांचे असताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.
भाजप मुख्यालयात सोमवारी अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या होत्या. इतर कोणत्याही उमेदवाराचे नामांकन न आल्याने नबीन यांची बिनविरोध निवड झाली.











