Shiv Sena Thackeray : …तर होऊ शकतो शिवसेना ठाकरे गटाचा महापौर!

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Shiv Sena Thackeray महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत योग्य पत्ते पडले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार महापौर होईल असा नवा दावा केला जात आहेत. या प्रकरणी कोणत्याही पक्षाकडे नाहीत असे दोन हुकमी एक्के ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे या चर्चेला ऊत आला आहे.Shiv Sena Thackeray

येत्या 22 जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. त्यात कोणत्या प्रवर्गाचा महापौर मुंबईच्या खुर्चीत विराजमान होणार? हे स्पष्ट होणार आहे. निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 2 जागा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यानुसार 53 व 121 हे 2 प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या दोन्ही प्रभागांत सर्वच पक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आरक्षण सोडतीत महापौर पद एसटीला सुटले तर त्यावर ठाकरे गटाचा उमेदवार बसेल हे निश्चित आहे.Shiv Sena Thackeray



महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 53 व प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यात प्रभाग क्रमांक 53 मधून ठाकरे गटाच्या जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाच्या अशोक खांडवे यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 121 मध्येही ठाकरे गटाच्याच प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला. इतर कोणत्याही पक्षाकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही. त्यामुळे दैवाने साथ दिली तर मुंबई महापालिकेचे महापौर पुन्हा ठाकरे गटाकडे चालत येईल.

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल असे विधान केले होते त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. विशेषतः मुंबई महापालिकेत ठाकरे गट व भाजपची युती होणार का? असा प्रश्नही या प्रकरणी उपस्थित केला जात होता.

त्यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. देवाच्या मनात म्हणजे मी नाही. महापौर महायुतीचाच होईल हे वरच्या देवाने ठरवले आहे, असे ते म्हणाले होते. असे असले तरी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीतच नेमके महापौर पद कोणत्या प्रवर्गाला सुटेल व त्यावर कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार आहे.

…Could Become Mayor From Shiv Sena Thackeray Faction

महत्वाच्या बातम्या