विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Eknath Shinde कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला काँग्रेसने कडवी झुंज दिली, या निकालामध्ये महायुतीने ४५ जागा मिळवत बहुमत घेतले. मात्र आता महायुती एकत्र राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काॅंग्रेस व शिवसेना शिंदे गट (Shinde Sena) एकत्र येऊन महापाैरपदावर दावा सांगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Eknath Shinde
भाजप २६, शिवसेना शिंदे १५, राष्ट्रवादी अजित पवार ४ अशा जागा महायुतीला मिळाल्या. काँग्रेसला ३४, शिवसेना १ अशा जागा महाविकासआघाडीला मिळाल्या आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका आणि महापौरपदाबाबत सूचक विधान केली. ‘पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही’, असे म्हणत त्यांनी अधिक तपशील देणे टाळले, पण त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यात संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे.महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आला तर स्पष्ट बहुमत मिळू शकते, अशा चर्चा सुरू आहेत. मुंबईतील सत्ता समीकरणांवर राज्यातील इतर महापालिकांचे निर्णयही अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. Shinde Sena
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये महायुती विरोधात शिंदेंची शिवसेना असे चित्र आहे. यामुळे कागलमध्ये शिंदेसेनेला काँग्रेस सोबत घेऊ शकेल का? असा सवाल सतेज पाटील यांना करण्यात आला. यावेळी पाटील यांनी आज त्यावर बोलणे संयुक्तिक नाही, परवा तुम्हाला कळेल, असे सूचक विधान सतेज पाटील यांनी केले.महापौरपदाबाबत मी आज बोलू शकत नाही. बॅकडोअरची चर्चा आम्ही पुढे आणू शकत नाही, असे सांगत ,सतेज पाटील यांनी सूचक विधान केले. अजून महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. सध्या आम्ही महापालिकेतून जिल्हा परिषदेत गेलेलो नाही. यातच माझ्या मुलग्याचे लग्न आहे. त्यामुळे मला यावर बोलायला थोडा वेळ द्या, असंही पाटील म्हणाले. \”महानगरपालिकेत मिळालेल्या यशामुळे आता जिल्हा परिषदेसाठी चांगले वातावरण झाले आहे, असंही पाटील म्हणाले. शक्तिपीठला लोकांचा विरोध कायम आहे. तुम्ही जर चार-चारवेळा जर अलायमेंट बदलत असाल तर तुम्हाला त्याची गरज नाही, असंही सतेज पाटील म्हणाले.
Shinde Sena’s bid for the mayor’s post in Kolhapur too, ready to unite with Congress?
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान