विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरीक डॉक्टर संग्राम पाटील यांना साेमवारी पुन्हा मुंबई विमानतळावर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या सगळ्या प्रकारात त्यांचे लंडनला जाणारे विमान सुटल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. Dr. Sangram Patil
डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे आहेत. ते सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. 10 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह मायदेशी परतले होते. त्यानंतर मुंबई विमानतळावर त्यांना चौकशीच्या नावाखाली दिवसभर बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली होती. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या संदर्भात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. संग्राम पाटील हे भाजप सरकारवरील आपल्या टीकेसाठी ओळखले जातात. त्यातूनच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आज 19 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह लंडनच्या दिशेने निघाले होते. पण मुंबई विमानतळावर पुन्हा त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले.
संग्राम पाटील यांनी आपण 19 जानेवारी रोजी सकाळच्या विमानाने ब्रिटनला परत जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले लूक आऊट सर्क्युलर मागे घेण्याची ग्वाही दिली होती. पण प्रत्यक्षात वेगळेच चित्र पहावयास मिळाले. संग्राम पाटील आज सकाळी 8 च्या इंडिगोच्या विमानाने ब्रिटनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले.
पण इमिग्रेशन काउंटरवरच त्यांना थांबवण्यात आले. त्यांना विमानात चढण्यास मज्जाव करण्यात आला. या गडबडीत त्यांचे लंडनचे विमान सुटले. संग्राम पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आधारावर त्यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.
डॉक्टर संग्राम पाटील यांच्यावर भाजप व तिच्या नेत्यांविरोधात सोशल मीडिवर आक्षेपार्ह लिखान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक निखील श्यामराव भामरे यांनी यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संग्राम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आल्याने हा विषय अधिकच गंभीर बनला आहे.
Dr. Sangram Patil questioned again at Mumbai airport
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान