विशेष प्रतिनिधी
मुंबई : Arun Gawli’s Son-in-Law मुंबईचा डॉन’ अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांचे पती आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत योगिता यांच्या जिद्दीचे व त्यांनी दिलेल्या लढ्याचे मनापासून कौतुक केले आहे. पराभवाने खचून न जाता योगिता यांनी केलेल्या कष्टाचा आणि जनसेवेचा आपल्याला अभिमान असल्याचे अक्षयने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.Arun Gawli’s Son-in-Law
योगिता यांना भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. अक्षय वाघमारे या पोस्टमध्ये म्हणतात, प्रिय बायको, सर्वप्रथम तुझे मनापासून आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे. प्रेग्नन्सी आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई असताना, एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन तू ज्या धैर्याने ही निवडणूक लढवलीस, ते खरंच थक्क करणारं आहे.Arun Gawli’s Son-in-Law
सत्ताधारी असो किंवा विरोधक, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे…कोणाच्याही तुलनेत वैयक्तिक पातळीवर तुला सर्वाधिक 6300 मतं मिळाली. तुझ्या आसपासही कुणी नाही, हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस. मम्मी, पप्पा, तू आणि अखिल भारतीय सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणितक कष्टाची ही पावती आहे. भायखळाच्या जनतेनं तुला भरभरून प्रेम दिलं. हे प्रेम पाहून स्पष्ट होतं की, लोकांसाठी तू आधीच निवडून आली आहेस. जनतेनं जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुझ्या कामावर अन् विकासावर विश्वास ठेवला आहे. गेल्या काही महिन्यांत तू घेतलेले कष्ट आणि तुला होणाऱ्या वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. आपली मोठी मुलगी आणि नुकतंच जन्मलेलं बाळ.. या दोघींना सोडून तू 12-12 तास काम करायची. कधी कधी तुझी आणि मुलींची भेट व्हायची नाही. तरीही तू फोनवरून त्यांची काळजी घ्यायची. तुझ्यातली हळवी आई मी अनुभवली आहे, असे ते लिहितात.
तुला बऱ्याचदा शारीरिक वेदना झाल्या. परंतु, तू कधीही याची तक्रार केली नाहीस. चिडली नाहीस, किंवा रागावली नाही. तुझा शांत अन् संयमी स्वभाव हीच तुझी खरी ताकद आहे. जनतेने तुझ्यावर आणि डॅडी यांच्या कतृत्वावर मोहोर उमटवली आहे. हा पराभव नक्कीच तुझा नाही. तर, तुझी ही राजकारणातील धमाकेदार एन्ट्री आहे. मला तुझा खूप अभिमान आहे. आता आणखी जिद्दीने कामाला लागूया. लव्ह यू आलवेस, असे अक्षय वाघमारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Arun Gawli’s Son-in-Law Says, ‘So Proud of You, My Dear Wife’
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान