Devendra Fadnavis : महाराष्ट्र भारतासाठी ‘गेटवे ऑफ इंडिया’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Devendra Fadnavis महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो, म्हणूनच जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास वाढत आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या वाटचालीसाठी सक्षम इकोसिस्टम उभी केली असून, त्याच बळावर यंदाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल, असे त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या च्या वार्षिक बैठकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री Uday Samant यांच्यासह प्रतिनिधीमंडळ दाखल झाले आहे. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे. अन्य राज्यांशी चांगल्या अर्थाने स्पर्धा असली तरी, या शर्यतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.Devendra Fadnavis

राज्यातील सर्व भौगोलिक भागांसाठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देत दहा ते बारा विविध क्षेत्रांतील उद्योगांशी समन्वय साधला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तिसरी मुंबई उभारणीसाठी मोठ्या गुंतवणुकीचे संकेत असून, गुंतवणूकदारांसाठी राज्याकडे भक्कम ‘मेन्यू कार्ड’ असल्याचे त्यांनी नमूद केले.



वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक ही उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी चावडीसारखी असून, महाराष्ट्राची क्षमता आणि संधी येथे दरवर्षी मांडल्या जातात. यंदा मागील वर्षांपेक्षा अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आतापर्यंत 60 ते 65 टक्के करार प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राला यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दशकात महाराष्ट्राचा विकासदर सरासरी 10 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. राज्य 2032 ऐवजी 2030 पर्यंतच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

FDI, MSME आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानावर भर

देशात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39 टक्के FDI महाराष्ट्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले. MSME हे अर्थव्यवस्थेचा कणा असून, रोजगारनिर्मितीत त्यांची भूमिका निर्णायक आहे. राज्याने 15 ते 16 धोरणे लागू करून गुंतवणूकदारांसाठी सक्षम वातावरण तयार केले आहे.

स्टार्टअप्स, एआय, डेटा आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र आघाडी घेईल, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात आहे आणि राज्य ‘डेटा सेंटर कॅपिटल’ म्हणून पुढे येत आहे.

नवी मुंबई क्लस्टर, वाढवण बंदर आणि सुरक्षित गुंतवणूक

नवी मुंबई विमानतळ परिसरात एज्यु सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि GCC सिटी उभारणीमुळे सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील. वाढवण बंदर पुढील 100 वर्षांसाठी सागरी आणि पुरवठा साखळीला बळ देईल. उद्योगांसाठी कायदा व सुव्यवस्थेवर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

Maharashtra Is India’s ‘Gateway Of India’, Asserts Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या