Shiv Sena : मुंबई महापालिकेच्या महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना गटाकडून आक्षेप
Shiv Sena : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महापौर कोण होणार? याकडे लागलं आहे. अशातच राज्यातील या महानगरपालिकांमध्ये सत्तास्थापनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या महापौरपदाची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 जानेवरी) सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात जाहीर झाली.











