AIMIM’s : कैसा हराया?” म्हणत एमआयएमच्या तरुण नगरसेविकेचा जितेंद्र आव्हाड यांना इशारा

विशेष प्रतिनिधी

ठाणे : AIMIM’s कैसा हराया?” म्हणत एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट आव्हान दिले आहे. पाच वर्षांनी याठिकाणी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठे प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला.AIMIM’s

ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एकहाती सत्ता आणली आहे. त्यामुळे या महापालिकेतील आपला गड राखत ठाणे महापालिकेवर पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेतील महापौर विराजमान होणार आहे. पण एमआयएमने सुद्धा या महापालिका निवडणुकीत राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. ठाण्यातही एमआयएमचे पाच नगरसेवक विजयी झाले असून या पाच नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक 30 मधून तरुण नगरसेविका म्हणून सहर शेख विजयी झाल्या आहेत. सहर शेख यांच्या विजयाचा जल्लोषही मुंब्र्यात करण्यात आला. पण, या विजयाच्या जल्लोषावेळी केलेल्या भाषणात सहर शेख यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरणासोबतच सामाजिक वातावरणही चांगलेच तापले आहे.AIMIM’s



ठाणे महानगरपालिकेतील मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्यानंतर सहर शेख यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सहर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना “कैसा हराया?” म्हटले. पण यावेळी त्यांनी म्हटले की, ” प्रभाग क्रमांक 30 मध्ये सगळ्यांनी भरभरुन मतदान करुन एमआयएमच्या उमेदवारांना विजयी केले. पण पाच वर्षांनी याठिकाणी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठे प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे. या लोकांना इथून पळून जायला लागले पाहिजे. पाच वर्षांनी मुंब्रा परिसरात सगळे एमआयएमचे उमेदवार निवडून येतील, ही मजलिसची ताकद आहे. ही ताकद आपल्याला अल्लाहने दिली आहे.” असे सहर शेख यांनी म्हटले. पण पाच वर्षांनंतर संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवायचा आहे, या सहर शेख यांच्या विधानामुळे नवा वाद पेटला असून यामुळे अनेकांनी संतप्त व्यक्त केला आहे.

नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे प्रचाराला गेले असताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या युनूस शेख यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यंदाच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनूस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळे सहर शेख या एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनूस शेख आणि सहर शेख या बाप – लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली.

“How Was I Defeated?”: AIMIM’s Young Corporator Warns Jitendra Awhad

महत्वाच्या बातम्या