Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत काँग्रेसचा चेहरा कोण ? अनुभव विरुद्ध नव्या नेतृत्वाची लढाई!

 विश्वजीत भालेराव

पुणे महानगरपालिकेत काँग्रेसच्या गट नेते पदासाठी चुरस लागणार ?

पुणे: Pune Municipal Corporation पुणे महानगरपालिकेच्या निकालानंतर काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत तब्बल १५ नगरसेवक निवडून आणले आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेस एक अंकी आकड्यातच अडकणार, अशी चर्चा होती. मात्र निकालांनी ही गणिते उलथवून लावली असून काँग्रेस आता महापालिकेतील दुसरा मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा गटनेता कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.Pune Municipal Corporation

या शर्यतीत प्रामुख्याने दोन नावे पुढे येत आहेत.पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रशांत जगताप.Pune Municipal Corporation



 

पुणे काँग्रेसचा गट नेता कोण होईल ?

अरविंद शिंदे हे काँग्रेसचे अनुभवी, संघटनात्मक कामकाजात सक्रिय आणि महापालिकेतील राजकारणाचा चांगला अनुभव असलेले नेते म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, काँग्रेसच्या परंपरागत गटात त्यांचे वजन मानले जाते.

दुसरीकडे प्रशांत जगताप हे काँग्रेससाठी तुलनेने नवे असले, तरी निवडणुकीत त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि स्थानिक पातळीवरील नियोजनामुळे त्यांच्या परिसरातील प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, अशी चर्चा आहे. अभ्यासू वृत्ती, आकडेवारीवर आधारित मांडणी आणि प्रशासकीय मुद्द्यांची जाण ही त्यांची प्रमुख ओळख आहे. माध्यमांमध्येही ते शांत, मुद्देसूद आणि धोरणात्मक भूमिका मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात.

आता खरा प्रश्न असा आहे की काँग्रेस नेतृत्व प्रशांत जगताप यांना योग्य तो सन्मान देणार का? त्यांच्या बौद्धिक आणि धोरणात्मक क्षमतेचा महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कितपत उपयोग करून घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर गटनेतापदाची संधी त्यांना मिळाली, तर काँग्रेस अधिक आक्रमक आणि मुद्देसूद विरोधी भूमिका घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

मात्र याच वेळी अरविंद शिंदे यांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. अनुभवी नेत्याला डावलल्यास नाराजी किंवा अंतर्गत कटुता निर्माण होईल का, हा प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसने यापूर्वीही अशा अंतर्गत समीकरणांमुळे महापालिकेत संधी गमावल्याचा अनुभव घेतला आहे.

एकंदर पाहता, काँग्रेससमोर नेतृत्व निवडीचे मोठे आव्हान आहे. अनुभव आणि नव्या नेतृत्वातील ऊर्जा यांचा समतोल साधत निर्णय घेतला, तर पुणे महापालिकेत काँग्रेस एक प्रभावी, सक्षम विरोधी पक्ष म्हणून स्वतःची भूमिका ठसवू शकते. अन्यथा गटनेतापदाची चुरसच काँग्रेससाठी पुढील काळात डोकेदुखी ठरू शकते.

Who will be the face of Congress in the Pune Municipal Corporation? Experience versus new leadership!

महत्वाच्या बातम्या