Bharat Gogawale : भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी अनुक्रमे ध्वजारोहणाची संधी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bharat Gogawale रायगड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी अनुक्रमे ध्वजवंदन आणि ध्वजारोहणाची मंत्री भरत गोगावले यांची इच्छा पूर्ण झाली आहे. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हा मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल, असे सामान्य प्रशासनाने काढलेल्या शासन परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे यंदा रायगडमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करण्याची महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची संधी हुकली आहे.Bharat Gogawale

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नाराजीमुळे रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदनाबाबत परिपत्रक काढले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. रायगड पालकमंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोगावले यांना पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाचा मान मिळाला आहे. तर मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजवंदनाच्या यादीत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा समावेश नाही.Bharat Gogawale



 

देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ 26 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवाजी पार्क, दादर येथे सकाळी सव्वानऊ वाजता ध्वजवंदन होईल. तर राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येईल.

हेही वाचा – Sachin Sawant : सरकार ‘दावोस’ ला का धावोस? सचिन सावंत यांची राज्य सरकारवर कवितेतून टीका

राजशिष्टाचार विभागाच्या परिपत्रकानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यात, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते बीड जिल्ह्यात, तर सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल.

जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे
मुंबई शहर – मंगल प्रभात लोढा
मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार
पालघर – गणेश नाईक
जळगाव – गुलाबराव पाटील
अमरावती – दादाजी भुसे
यवतमाळ – संजय राठोड
रत्नागिरी – उदय सामंत
धुळे – जयकुमार रावल
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
चंद्रपूर – डॉ. अशोक उईके
सातारा – शंभुराज देसाई
वाशिम – दत्तात्रय भरणे
लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार – योगेश कदम
सोलापूर – जयकुमार गोरे
हिंगोली – नरहरी झिरवाळ
भंडारा – संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
धाराशिव – प्रताप सरनाईक
बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग – नितेश राणे
अकोला – आकाश फुंडकर
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर
गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल
वर्धा – डॉ. पंकज भोयर
परभणी – मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
गोंदिया – इंद्रनील नाईक

Bharat Gogawale to Hoist Flag on Republic Day and Independence Day in Raigad District

महत्वाच्या बातम्या