Mayor Reservation : यंदा नवीन चक्राकार पद्धतीने महापौरपदासाठी आरक्षण सोडत?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mayor Reservation  मुंबई महापालिकेत कोणत्याही पक्षाला मुंबईकरांनी बहुमत दिले नाही. मात्र भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीला बहुमतापर्यंत मजल मारता आली आहे. परंतु महापौर पदावरून महायुतीचे घोडे अडकले आहे. तर दुसरीकडे महापौर पदासाठी 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असली तरी यावेळी जुन्या कार्यपद्धतीला बगल देत नवीन चक्राकार पद्धतीने महापौर पदासाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा कोणाला? आणि कसा काय मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.Mayor Reservation

मागील जुन्या पद्धतीने महापौर आरक्षण सोडत काढल्यास एसटी (अनुसूचित जमाती) वर्गासाठी आरक्षण सोडत निघाली असती, तर भाजप आणि शिवसेनेकडे (शिंदे) एसटी प्रवर्गातून विजयी उमेदवार नसल्याने या दोन्ही पक्षांची मोठी गोची झाली असती. वास्तविक, एसटी वर्गातील महिला आणि पुरुष उमेदवार प्रभाग क्रमांक 53 मध्ये शिवसेनेचे जितेंद्र वळवी आणि प्रभाग क्रमांक 121 मध्ये प्रियदर्शनी ठाकरे हे दोन्ही उमेदवार शिवसेनेकडून (ठाकरे) विजयी झाले आहेत. त्यामुळे बहुमत हाती असताना मुंबईच्या महापौर पदाची माळ ही ठाकरे यांच्या एसटी प्रवर्गातील विजयी उमेदवाराच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे कदाचित याच कारणामुळे, मुंबईतील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत यावेळी नवीन चक्राकार पद्धतीने काढण्याचा निर्णय नगरविकास खाते आणि निवडणूक आयोग यांच्याकडून घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.Mayor Reservation



मागील 2017 चे आणि 2020 चे महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. यावेळी जुन्या पद्धतीने महापौर पद आरक्षण सोडत काढल्यास ते एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यास भाजप आणि शिवसेना ( शिंदे) या दोन्ही पक्षांची गोची झाली असती. त्यामुळे कदाचित जुनी पद्धत न अवलंबता नवीन चक्राकार पद्धतीने महापौर पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नवीन चक्राकार पद्धतीत खुला वर्ग वगळल्यास एससी आणि ओबीसीसाठी आरक्षण सोडत निघण्याची शक्यता जास्त वर्तविण्यात येत आहे.

महापौर पदासाठी मागील दोन खुल्या वर्गाचे आरक्षण वगळून अन्य प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढल्यास त्यामध्ये एससी आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघण्याची जास्त शक्यता वर्तविण्यात येत आहे. एसटी प्रवर्गात फक्त महिला व पुरुष दोन उमेदवार संख्या असल्याने या प्रवर्गाचा विचार केला जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नवीन चक्राकार पद्धतीत एससी आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यावर जोर दिला जाण्याची शक्यता जास्त वाटते.

आतापर्यंत महापौरपदाचे असे होते आरक्षित प्रवर्ग
1998 – ओबीसी
1999 – एससी
2000 – सर्वसाधारण
2000 – एससी
2004 – सर्वसाधारण
2007 – ओबीसी महिला
2009 – सर्वसाधारण महिला
2012 – सर्वसाधारण
2014 – एससी महिला
2017 – सर्वसाधारण
2020 – सर्वसाधारण

New Rotational System For Mayor Reservation Draw This Year?

महत्वाच्या बातम्या