Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Gangster Ravi Pujari
मुंबई

Gangster Ravi Pujari : गँगस्टर रवी पुजारीला अटक; कोरिओग्राफर रेमो डिसोझाकडे मागितली होती खंडणी

बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसोझा यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याला अधिकृतपणे अटक केली आहे. २०१८ मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी पुजारीला या प्रकरणात ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : भाजपला कल्पना पण नव्हती त्यावेळी बाळासाहेबांनी हिंदू शक्ती बनू शकते हे दाखवून दिले, राज ठाकरे यांचा निशाणा

ळासाहेबांनी या देशात हिंदूंना हिंदू शक्ती बनू शकते हे दाखवून दिले. भाजपला तर त्यावेळी कल्पना पण नव्हती, असा निशाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साधला. शिवसेना संस्थापक पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने श्री षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आले होते. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही, उद्धव ठाकरे यांचा निशाणा

बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचे कसे हे आधी शिकवले. जर जगायचे कसे हेच आपण विसरून गेलो तर जसे पूर्वी गुलामगिरीत जगायचो, तसेच या दोन व्यापरांच्या गुलामीत जगावे लागेल. मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

BMC
मुंबई

BMC : मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट? स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील समीकरणे बदलणार

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने महायुतीमध्ये निवडणूक लढवली असली तरी निवडून आल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आपल्या गटांची स्वतंत्र नोंदणी न करता एकत्रपणे आपल्या गटाची नोंदणी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे.

Chhagan Bhujbal
मुंबई

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष; ईडी मनी लॉन्डरिंग केसला पूर्णविराम

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळ्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने आज अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) दाखल प्रकरणातून भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली

Vikas Gogawale
महाराष्ट्र

Vikas Gogawale : उच्च न्यायालयाने कान टोचल्यावर विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर

Vikas Gogawale  महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

Congress
महाराष्ट्र

Congress : भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीची एमआयएमशी हातमिळवणी

अकोला महानगरपालिकेत 38 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 चा आकडा गाठण्यापूर्वीच त्यांना रोखण्यासाठी शहरात ‘हाय व्होल्टेज’ राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

Pune MahanagarPalika
पुणे

Pune MahanagarPalika : पुण्याच्या कारभाराची सूत्रे ‘सावित्रीच्या लेकी’कडे? भाजपकडून महिला नेतृत्वावर शिक्कामोर्तब! पाहा ह्या आहेत शर्यतीत!

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १६५ जागांपैकी तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. या स्पष्ट बहुमतामुळे आता पुणेकरांचे लक्ष एका प्रश्नाकडे केंद्रित झाले आहे.ते म्हणजे

CM Fadnavis
मुंबई

CM Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका! 30 लाख कोटींचे सामंजस्य करार, 18 देशांमधून गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी इथून महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली आहे तसेच राज्याच्या कोणत्या भागात व कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक आली आहे, यांची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Minister Dada Bhuse
मुंबई

Minister Dada Bhuse : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरत/ व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

Sahar Shaikh
मुंबई

Sahar Shaikh : मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख अडचणीत; पोलिसांनी थेट बजावली नोटिस

मुंब्र्याला हिरवं करायचं आहे हे विधान नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

Ladki Bahin’
मुंबई

Ladki Bahin : लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती, २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांचा शोध घेण्यासाठी पात्र महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनाला आले. त्यामुळे २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करा, असे स्पष्ट आदेश महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.